वृद्धेश्वर साखर कारखान्यासाठी या दिवशी होणार मतदान
पाथर्डी । वीरभूमी - 04-Jan, 2021, 12:00 AM
तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 7 जानेवारी 2021 पासून प्रारंभ होत असून मतदान 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
पाथर्डी तालुक्याची कामधेनू म्हणुन वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या टप्प्यावर निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणुन पाथर्डी-शेवगावचे प्रांताधिकारी देवदत्त केकाण हे काम पाहणार असून त्यांना सहाय्यक म्हणून पाथर्डीचे तहसीलदार वाडकर यांची नियक्ती केली आहे.
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दि. 7 ते 13 जानेवारी 2021 या काळात उमेदवारी अर्ज दाखल करणे. 14 जानेवारी रोजी दाखल अर्जाची छाननी, 15 जानेवारी रोजी वैध अर्जाची यादी प्रसिद्ध करणे. 18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2021 या काळात माघारीची मुदत असून 2 फेब्रुवारी 2021 रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. तर गरज भासल्यास 12 फेब्रुवारी 2021 रोजी मतदान होणार असून 13 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली आहे.
Comments