पाथर्डी । वीरभूमी- 27-Dec, 2020, 12:00 AM
मांसहारी जेवणात अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या तिसगाव येथील हॉटेल समर्थ ने आज पासून ग्राहकांच्या सेवेत दर्जेदार स्वादिष्ट व माफक दरात मटण आणि चिकन थाळी सुरू केली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तिसगाव येथील बस स्थानक परिसरातील शेवगाव रोडवरील हॉटेल समर्थ ने जेवणामध्ये आपला एक आगळा वेगळा ठसा उमठविला आहे. दर रविवारी असणारा दालचा मटण, बिर्याणी ,किंवा काळ्या मसाल्यातील मटण असो यास ग्राहकांनी चांगली पसंती दिली आहे. आता यात आणखी भर म्हणून समर्थ हॉटेलने मटण व चिकन थाळी सुरू केलेली आहे. पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड आणि तिसगावचे सरपंच तथा जेष्ठनेते काशीनाथ पाटील लवांडे यांच्या शुभहस्ते फंगशन हॉल व मटण थाळीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच इलियास शेख सर, संत नरहरी पतसंस्थेचे चेअरमन धीरज मैड, रफिक शेख सर, शिक्षक नेते कल्याण लवांडे सर, ग्रामपंचायत सदस्य पापाशेठ तांबोळी, अंबादास शिंदे, लक्ष्मण गवळी, दीपक डहाळे, सचिन लवांडे, अखिल लवांडे, शिराज पठाण, समीर शेख, सुभाष खंडागळे, सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन प्रदीप वाघ, भूषण शिंदे, बब्बू शेख, सचिन साळवे, सुधीर साळवे, गणेश फडतरे, शरद कोलते, इकबाल शेख, जेम्स साळवे, वैभव विधाते, आदिनाथ कवळे, हॉटेलचे मॅनेजर आंनद मोढवे, जुबेर शेख, वाजीद पठाण आदी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना हॉटेलचे संचालक भाऊसाहेब लवांडे व सुनील अकोलकर यांनी सांगितले की ग्राहकांना परवडेल व आवडेल आशा पद्धतीची ही थाळी सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. मटण थाळी 200 तर स्पेशल मटण थाळी 260 रुपयात ठेवण्यात आली आहे. याचबरोबर चिकन थाळी 170 तर स्पेशल चिकन थाळी 220 रुपयात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. थाळी मध्ये वेगवेगळे मेनू उपलब्ध असल्याने ग्राहकांसाठी ती पर्वणीच ठरणार आहे. त्याचबरोबर प्रशस्त फंगशन हॉल सुरू करण्यात आल्याने वाढदिवस, पार्टी आदी कार्यक्रम साजरे करता येणार आहेत.
mUOgBdaseXFCLIW