आमच गाव आमचा विकास आंतर्गत वार्षिक विकास आराखडा कार्यशाळा संपन्न
वीरभुमी- बोधेगाव 21-Nov, 2020, 12:00 AM
सध्या सर्वच ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक पध्दतीचा वापर केला जात आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या प्रकरणाला लागणारा वेळ, कागदपत्रे आणि त्रूटी यामध्ये आनेक दिवस निघून जातात त्यामुळे वेळ आणि चुका कमी करण्यासाठी ईलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केल्यास तो सर्वासाठी हितकारक ठरणार आसल्याचे मत शेवगांव पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज घुले यांनी मांडले.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य आंतर्गत जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती शेवगांव यांचे सयुक्त विद्यमाने आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत सन २०२१-२२ या कालावधीचा वार्षिक विकास आराखडा तयार करणेबाबत तालुका स्तरीय पदाधिकारी, अधिकारी यांची एक दिवशीय कार्यशाळा शेवगांव पंचांयत समितीमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी ते व्यासपीठावरुन बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत च्या माध्यमातून विकास साधला जातो. यामध्ये मुख्यतः स्वच्छता आणि पाणी पुरवठा या दोन मूलभूत गोष्टीवर भर देणार असुन या कामासाठी ५० टक्के निधी राखून ठेवणार आहे. मागील तीन वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्याचा संघर्ष तालुक्यातील कित्येक गावानी आनुभवला या वर्षी पर्जन्यमान चांगले आसेल तरी पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. राळेगण सिद्धि किंवा पोपट पवारांचे हिवरे बाजार आसेल त्या पद्धतीचे मॉडेल व्हिलेजेस सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम १५ व्या वित्त आयोगातुन तयार करणार आहोत. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेतील तालुका आरोग्य आधिकारी डॉ सलमा हिराणी यांनी उत्तम नियोजन करत डॉक्टर्स, सिस्टर, व कर्मचारी स्टाफ याच्या माध्यमातून तालुक्यात कोरोनाला रोखून धरण्याचे काम केले. तसेच ग्रामपंचायत पातळीवर सर्वच कर्मचारी यानी देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. तर पंचायत समितीमध्ये ईलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन फायदे होणार आसुन एक लागणारा वेळ आणि दुसरी त्रूटी ह्या कमी होउन सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होणार आहे. दरम्यान प्रकरणाच्या कागदपत्राची फाईल ही स्कॅन पद्धतीने जिल्हा परिषदेला पाठवण्या संदर्भात प्रस्ताव देखील दिला आहे. तर येणाऱ्या प्रकरणाचा निधी हा आरटीजीएस पध्दतीने पाठवल्यास वेळ कमी लागणार आहे.
या कार्यशाळेत सभापती डॉ.क्षितीज भैय्या घुले, मा. प. स. ऊपसभापती शिवाजी नेमाने सदस्य मंगेश थोरात, भाऊराव भोगळे, सरपंच संतोष पावसे गटविकास अधिकारी महेश डोके विस्तार अधिकारी मल्हारी ईसरवाडे, घरकुल विभागाचे जगताप, एम आर जि एस चे सचिन भाकरे, कृषी चे रामकिसन जाधव, तसेच प्रभाकर गटकळ हे उपस्थित होते.
Comments