कोरोनाच्या काळात निराश झालेल्या तरुणाईला, महिलांना दिला रोजगार
अहमदनगर । वीरभूमी - 01-Dec, 2020, 12:00 AM
संकटे येत असतात अन बर्याचदा सर्व काही कोलमडून जाते. तरीही संकटाना घाबरून जायचे नसते तर त्यात शोधायची असते एक संधी. समाजाला सोबत घेत व्यवसाय करण्याची प्रचंड तळमळ व जाणीव असणारे तरुण उद्योजक म्हणजे महेंद्र निकम. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या खेड्यातून आलेला हा तरुण एक उच्चशिक्षित कम्प्युटर इंजिनिअर आहे.
महेंद्र टेक्नोसोफ्ट प्रायवेट लिमिटेड (Mahendra Technosoft Pvt. Ltd) बाणेर, पुणे ही त्याची कंपनी साधारण पाच वर्षांपासून कार्यरत आहे. कोरोनाच्या काळात अनेक हातांचे काम गेले, सर्व बंद असताना रोजगारासाठी प्रचंड हाल होत असताना महेंद्र यांनी आपल्या कंपनीच्या माध्यामातून अनेक प्रोजेक्ट आणले. घरबसल्या बेरोजगार युवकांना काम करता येईल का? काही परिस्थितीमुळे घराच्या बाहेर जाऊ न शकणार्या आपल्या भगिनींना घरीच ऑनलाईन पद्धतीने काम करता येईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक ऑनलाईन प्रोजेक्ट त्यांच्यासाठी घेऊन आले.
कोरोनाच्या काळात जवळपास 700 लोकांना फ्री लान्सर रोजगार दिला व फ्री लान्सरच्या पगारासाठी जवळपास लॉकडाऊन च्या काळात 2 कोटी पेक्षा जास्त रुपये देत सामाजिक जाणीवे बरोबरच आपली उद्योजकीय वाटचाल चालूच ठेवली. त्यांच्या या कामाचे नक्कीच सर्वत्र कौतुक होत आहे.
भविष्यात डिजीटल ऑफिसच्या माध्यमातून देशभरातून असंख्य हाताना त्यांच्या घरी बसून काम देत वाटचाल करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेषत: देशाच्या ग्रामीण भागात घरकाम सांभाळत महिलांना त्यांच्या घरूनच ऑनलाईन काम करत रोजगार मिळावा या विचाराने उद्योजक महेंद्र निकम व त्यांची टीम कंपनी अनेक प्रकारचे संशोधनाचे काम करत आहे.
लवकरच अनेक नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेकांना त्यांच्या घरूनच ऑनलाईन रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्योजक महेंद्र निकम यांचा मानस आहे. एका ध्येयवेड्या तरुणाचा उद्योजकीय प्रवास नक्कीच युवा वर्गाला प्रेरणा देणारा आहे.
आपल्यापैकी किंवा कुणीही अशा प्रकारे ऑनलाईन काम करण्यास इच्छूक असल्यास आपण https://jobstricks.com/freelancer या लिंकवर नक्की भेट द्यावी. अधिकाधिक ऑनलाइन पद्धतीने काम करण्याच्या या कार्यात आपणही सहभागी व्हावे असे आवाहन उद्योजक महेंद्र निकम यांनी केले आहे.
Comments