सहकारी संस्थेत 17 लाखांचा अपहार; 27 जणांवर गुन्हा दाखल
सहकारी संस्थेत 17 लाखांचा अपहार; 27 जणांवर गुन्हा दाखल
श्रीगोंदा तालुक्यातील वेळू विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये अध्यक्ष आणि संचालक व सचिव यांनी संगनमत करून सुमारे 17 लाखांचे बोगस कर्जवाटप करून अपहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात 27 जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी विशेष लेखा परीक्षण सुनिल खर्डे यांनी फिर्याद दिली असून श्रीगोंदा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वेळू येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेमध्ये एप्रिल 2009 ते दि.31 मार्च 2017 या कालावधीचे संस्थेचे फेर लेखा परीक्षण करून, त्याचा अहवाल सहाय्यक निबंधक यांच्याकडे सादर करण्याचे आदेश झाल्यानंतर, हे लेखा परीक्षण करण्यासाठी सुनील नामदेव खर्डे (विशेष लेखा परीक्षण वर्ग 2, संगमनेर) यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी दि. 31 डिसेंबर 2019 मध्ये संस्थेचे लेखा परीक्षण पूर्ण केले.
त्याप्रमाणे संस्था व्यवस्थापन 2010-2015 या कालावधीमध्ये संस्थेचे संचालक म्हणून चेअरमन संजय प्रेमराज आगविले, वसंत यशवंत औटी (मयत), रामदास नामदेव हराळ (रा. श्रीगोंदा), जगन्नाथ विठोबा डेबरे (रा. वेळू), बन्सी बाबुराव पाचारणे, राजू धोंडीबा सांगळे, गणेश माधव येडे, नागनाथ राजाराम पिंपळे, सुलोचना माधव पिंपळे, पोपट निवृत्ती चिखलठाणे (सहाय्यक सचिव), मारुती विष्णू अनभुले (मयत सचिव), तसेच 2015-20 याकालावधीमध्ये संचालक मंडळात नितीन वसंत औटी (चेअरमन), मारुती एकनाथ देवखिळे, नवनाथ एकनाथ वडवकर, शिवाजी गंगाराम पिंपळे, रावसाहेब मोहन येडे, पंडित विनायक पाटील, लक्ष्मण यादवराव देवखिळे, विजय रामराव चोर, दिलीप धोंडीबा सांगळे, बन्सी बाबुराव पाचारणे, अलका दिलीप डेबरे, लता पांडुरंग वडवकर, सुनिता संदीप पायमोडे, पोपट निवृत्ती चिखलठाणे (सहाय्यक सचिव), मारुती विष्णू अनभुले (मयत सचिव) यांनी संचालक म्हणून काम पाहिले.
या कालावधीतील लेखा परीक्षण अहवाल लेखा परीक्षक सुनील खर्डे यांनी तयार केला असून, त्यामध्ये दिनांक 1 एप्रिल 2009 ते दिनांक 31 मार्च 2017 या कालावधीमध्ये संस्थेचे सन 2010 ते 20 मध्ये चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव, संचालक यांनी अफरातफर करून, जिल्हा सहकारी बँक शाखा श्रीगोंदा येथील बँक इन्स्पेक्टर शिवाजी छगन मोटे यांनी थकीत कर्जदार यांचे पहिले थकीत कर्जदार असल्याचे माहित असूनही त्याची पूर्ण वसुली न करता त्यांना दुबार कर्ज मंजूर करून, संस्थेचे संचालक मंडळ, सचिव सहाय्यक सचिव यांनी संगनमताने सुमारे सात लाख 37 हजार 55 रुपये थकीत कर्जदारांकडून वसूल केले.
परंतु कोणत्याही हिशोबात घेतलेले नाही. तसेच एक लाख 75 हजार रुपये वाटप केलेले कर्ज अमान्य, 7 लाख 27 हजार 962 प्रथम कर्ज थकीत असून, त्यातील 12 ते 26 कर्जदारांचे कर्ज नष्ट केले. आणि 4 हजार 837 रुपये दुबार व 2 लाख 40 हजार विना व्हाऊचर संचालकाची मंजुरी न घेता मेहनताना रक्कम काढली आहे. अशी मिळून एकूण रक्कम 16 लाख 68 हजार 854 रुपये या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी फिर्यादी सुनील नामदेव खर्डे यांच्या फिर्यादीनुसार 27 जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजनकर हे करत आहेत.
VBephqsH