शेवगाव । वीरभूमी - 25-Dec, 2020, 12:00 AM
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने रविवार, दिनांक २७ डिसेंबर, २०२० रोजी शेवगाव , जि. अहमदनगर येथील प्रशस्त अशा अजिंक्य लाँस मध्ये २७ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये हे समेलनाद्यक्ष असून माजी आमदार मा. श्री. चंद्रशेखर घुले हे उदघाटक आहेत तर श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, आमदार मोनिका राजळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर तर ज्येष्ठ साहित्यिक रमेश भारदे, जि परिषद सदस्य हर्षदा काकडे, पंचायत समिती अध्यक्ष डॉ. क्षितिज घुले, माजी सभापती अरुण पाटील लांडे, नगरसेवक अरुण पाटील लांडे, सुनील रासणे हे प्रमुख पाहुणे आहेत.
प्रसिद्ध कवी दिनेश लव्हाट सवागताध्यक्ष तर प्रसिद्ध उद्योगपती डी एस काटे हे निमंत्रक आहेत. सकाळी ९ पासून ग्रंथदिंडी, उदघाटन, पुस्तक प्रकाशन पुरस्कार वितरण, चर्चासत्र, प्रबोधन नाटिका, कविसंमेलन अशा विविध सत्रांनी हे संमेलन उल्लेखनीय ठरणार आहे.
आजच्या सामाजिक समस्या या विषयावर ज्येष्ठ विचारवंत शिवाजीराव देवढे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होणार आहे. प्रसिद्ध कवी कैलास दौंड, देविदास शिंदे व अर्चना डावखर यांच्या अध्यक्षतेखाली तीन कविसंमेलनाचे सत्र होणार आहेत.
प्रसिद्ध अभिनेते फुलचंद नागटीळक यांच्या नटसम्राट या नाट्यप्रयोगाचा ५३५१ वा प्रयोग या ठिकाणी सादर होणार आहे. या संमेलनाची ही सर्व माहिती परिषदेचे संस्थापक, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी दिली. परिषदेचे कार्याद्यक्ष शरद गोरे, परिषदेचे अहमदनगर संघटक राजेंद्र मराठे व शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनास राज्यभरातून साहित्य, कला, शिक्षण, प्रसार माध्यम आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर या संमेलनास उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या वतीने राज्यभरात पुणे, नवी मुंबई, नांदेड, उदगीर, औरंगाबाद, संगमनेर, रत्नागिरी, बारामती, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, तुळजापूर, लोणी काळभोर, यवतमाळ, पालघर, गोंदिया या ठिकाणी संमेलन झाले आहेत.
Comments