सोनई । संदीप दरंदले - 05-Jan, 2021, 12:00 AM
नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून सोनई ग्रामपंचायतीत सरळसरळ निवडणूक होत आहे. सोनई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माघारी घेण्यास शेवटच्या दिवशी पारंपारीक विरोधक राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व माजी खा. तुकाराम गडाख व प्रकाश शेटे यांच्या पॅनलमध्ये लढत होत असुन निवडणुकीच्या रिंगणात काही अपक्षही आपले नशीब अजमावत आहेत.
सोनई ग्रामपंचायतीच्या 6 प्रभागात 17 जागांसाठी 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. यामध्ये दोन्ही गटासह 6 अपक्ष उमेदवारही आपले नशिब अजमावत आहेत.
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाचे उमेदवार याप्रमाणे प्रभाग-1 मध्ये नवनाथ गोपीनाथ दरंदले, श्वेताली कृष्णा दरंदले, सवित्रा बापू ओहळ. प्रभाग 2 मध्ये धनंजय सखाराम वाघ, सुरेखा सचिन पवार, जयश्री सुनिल तागड. प्रभाग-3 मध्ये किशोर अशोक वैरागर, सविता अंबादास राऊत. प्रभाग-4 प्रसाद बाळकृष्ण हारकाळे, इप्तेसाम जमशेद सय्यद, सुनिता रमेश उमाप. प्रभाग 5 भानुदास चिमा कुसळकर, मच्छिंद्र पिराजी कुसळकर, विद्या नितीन दरंदले. प्रभाग-6 राजेंद्र भिमराज बोरुडे, प्रभाकर बबन गडाख, अलका सखाराम राशिनकर
तर माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकाश पोपट शेटे यांच्या पॅनलचे उमेदवार - प्रभाग-1 चांगदेव किसन बारगळ, सविता अशोक आगळे, सुरेखा अरुण चांदघोडे. प्रभाग-2 नामदेव मधुकर येळवंडे, शोभा संतोष तेलोरे, ताराबाई नामदेव शिंदे. प्रभाग-3 संतोष भास्कर वैरागर, अनिता भाऊसाहेब खेसमाळसकर, प्रभाग-4 ॠषीकेश वसंत शेटे, शोभा प्रकाश शेटे, शामला मधुकर येळवंडे. प्रभाग-5 अक्षय बाळासाहेब शेटे, प्रकाश पोपट शेटे, शामला मधुकर येळवंडे. प्रभाग-6 लक्ष्मण आण्णासाहेब कुसळकर, सुरज युवराज मुरकुटे, शामला मधुकर येळवंडे.
अपक्ष उमेदवार प्रभाग-1- ज्ञानेश्वर रामदास सुर्यवंशी, प्रभाग-3 सनी पीटर साळवे, नंदकिशोर विश्वनाथ वैरागर, प्रभाग-4 ॠषीकेश नितीन जंगम, सुभाष परशुराम बारहाते, प्रभाग-5 संदीप अशोक कुसळकर, प्रभाग-6 भाऊसाहेब रामदास खेसमाळसकर.
अनेक दिवसांपासून तुकाराम गडाख हे राजकिय विजनवासात होते. आता सोनई ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा राजकिय आखाड्यात उतरत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार हे नक्की.
nPgSKeMUdlIXCw