शेवगाव । वीरभूमी- 05-Jan, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी 843 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तालुक्यातून एकाही ग्रामपंचायतीला बिनविरोधचे खाते खोलता आले नाही. मात्र अनेक जागा बिनविरोध झाल्या असून सुमारे सर्वच ग्रामपंचायतीमध्ये दोन गटामध्ये सरळसरळ लढत होत आहे. यामुळे निवडणुकीत चुरस पहायला मिळणार असून प्रचाराचा धुराळा उडणार आहे.
शेवगाव तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी ऑनलाईन पद्धतीने 1045 तर ऑफलाईन पद्धतीने 288 असे एकुण 1333 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या दाखल अर्जाची छाननी होऊन 38 अर्ज अवैध तर 1295 अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसाअखेर तब्बल 440 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 843 उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात राहीले आहेत.
या सर्व ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असून 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सुमारे सर्व गावात दुरंगी लढती रंगणार आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात ग्रामपंचायतीनिहाय उमेदवारांची संख्या- अधोडी-2, आखतवाडे 17, निंबेनांदूर 18, अंरवाली बुद्रुक 14, अंतरवाली खुर्द 13, आव्हाणे 18, ढोरजळगाव शे 22, बक्तरपूर 14, भातकुडगाव 26, बेलगाव 9, चेडेचांदगाव 17, भावीनिमगाव 27, मजलेशहर 23, बोडखे 12, तळणी 18, चापडगाव 22, दादेगाव 11, दहिगाव शे 17, लखमापुरी 13, ढोरजळगाव ने 16, मळेगाव शे 18, गदेवाडी 19, हातगाव 32, गायकवाड जळगाव 18, कांबी 30, घोटण 28, हसनापूर 25, सोनेसांगवी 15, दहिफळ (जुने) 18,
दहिफळ (नविन) 14, खुंटेफळ 15, ताजनापूर 13, कोळगाव 15, सोनविहिर 14, कोनोशी 19, नागलवाडी 18, शेकटे बु. 13, नजिक बाभुळगाव 18, ठाकुर निमगाव 19, पिंगेवाडी 20, राक्षी 18, राणेगाव 21, शिंगोरी 19, सुकळी 14, ठाकुर पिंपळगाव 14, सुलतानपुर बु. 18, वाडगाव/मुर्शतपूर 15, वरखेड 14 या प्रमाणे उमेदवारांची संख्या आहे.
fXdClqHJZBiwNSDv