पाथर्डी । वीरभूमी- 13-Jan, 2021, 12:00 AM
तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवसा अखेर तब्बल 104 उमेदवारांनी 120 अर्ज दाखल केले आहे. पहिला, दुसरा दिवस निरंक गेल्यानंतर तिसर्या दिवशी 7, चौथ्या दिवशी 62 तर पाचव्या दिवशी 58 अर्ज दाखल झाले आहेत.
पाथर्डी तालुक्याची कामधेनू म्हणुन वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या टप्प्यावर निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.
बुधवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे- (कंसात एकूण अर्ज) कासार पिंपळगाव गट-(12) उद्धवराव रघुनाथ वाघ, सुनील रघुनाथ काजळे, अर्जुन दादाबा राजळे, भाऊसाहेब मळू उघडे, बापुसाहेब पाराजी पाटेकर, चारुदत्त उद्धवराव वाघ.
चितळी गट (16)- शेषराव सूर्यभान कचरे (2 अर्ज), सुभाष बाबुराव ताठे, बाजीराव आश्राजी गर्जे, अरुणराव किसन आहेर, विष्णू सीताराम सातपुते.
कोरडगाव गट- (14) संभाजी दिपाजी गर्जे, दिलीप दामोदर देशमुख, अरविंद शिवाजी देशमुख, माणिक वामन दराडे.
पाथर्डी गट-(3) रामकिसन काशिनाथ काकडे.
मिरी गट-(11) बाबासाहेब बलभिम मचे, आसाराम एकनाथ अकोलकर, भगवान शंकर म्हस्के, बापुसाहेब गोविंद घोरपडे, रेवननाथ मोहन वाबळे, राजेंद्र निवृत्ती गवळी.
टाकळीमानूर गट-(18) भिवसेन गेणू खेडकर, शेषराव सूर्यभान ढाकणे, गहिनीनाथ लक्ष्मण थोरे, माणिक कोंडीबा खेडकर, गहिनाथ पाटीलबा ढाकणे, बाबासाहेब उत्तम ढाकणे, भरतकुमार अंबादास दहिफळे.
कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था व बिगर उत्पादक संस्था सभासदांनी निवडून द्यावयाचा प्रतिनिधी-(10) मोनिका राजीव राजळे (2 अर्ज), आप्पासाहेब दादाबा राजळे, राहुल आप्पासाहेब राजळे (3 अर्ज).
अनुसूचित जाती-जमातीचा प्रतिनिधी-(7) अंबादास धोंडीबा बळीद
महिला प्रतिनिधी- (13) मोनिका राजीव राजळे, रत्नप्रभा शेषराव कचरे (2 अर्ज), द्वारकाबाई अरुणराव आहेर.
इतर मागास प्रवर्ग-(8) कुशिनाथ खंडू बर्डे, अमोल अच्यूतराव वाघ, बापुसाहेब दिनकर पाटेकर.
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी- (8) शेषराव सूर्यभान ढाकणे, देवराव बाजीराव शेंडे, भरतकुमार अंबादास दहिफळे, लक्ष्मण किसन हंडाळ, बाबासाहेब आश्रू गर्जे.
वरील प्रमाणे एकूण 104 जणांनी 120 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये पाथर्डी गटात दोन जागेसाठी दोन जणांचे तीन अर्ज आल्याने हा गट बिनविरोध होणार आहे. तर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था व बिगर उत्पादक संस्था सभासदांनी निवडून द्यावयाचा प्रतिनिधी गटात आप्पासाहेब राजळे, मोनिका राजळे व राहुल राजळे यांचे 10 अर्ज आहेत. या गटातून एक प्रतिनिधी निवडून द्यावयाचा असून वरील तीनही उमेदवार एकाच कुटुंबातील असल्याने ही जागाही बिनविरोध होणार आहे.
Comments