मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध
सोनई । संदीप दरंदले - 19-Jan, 2021, 12:00 AM
स्थापनेपासुन जेष्ठ नेते माजी.खा.यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री नाम.शंकरराव गडाख यांच्या आधिपत्याखाली असलेला सोनईचा मुळा सहकारी साखर कारखाना मंञी गडाखांच्या प्रयत्नानंतर कारखान्याची निवडणुक बिनविरोध झाली.
आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख गटाचे एकवीस अर्ज शिल्लक राहिले. इतरांनी अर्ज मागे घेतल्याने अखेर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी निवडणुक बिनविरोध झाल्याचे जाहिर केले.
नुतन संचालकांचे नावे पुढील प्रमाणे
सोनई गट-
ना. शंकरराव गडाख, कारभारी डफाळ,
घोडेगाव गट-
बाबुराव चौधरी, लक्ष्मण पांढरे,
खरवंडी गट-
भाऊसाहेब मोटे, बापुसाहेब शेटे
करजगाव गट-
संजय जंगले, बबन दरंदले, दामोधर टेमक.
नेवासे गट-
निलेश पाटील, नारायण लोंखडे,
बाबासाहेब भणगे,
प्रवरासंगम गट-
बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गोरे,
कडूबाळ कर्डिले.
सेवा संस्था प्रतिनिधी-नानासाहेब तुवर.
अनुसूचित जाती जमाती-
कडूबाळ गायकवाड,
महिला प्रतिनिधी-
तारा सुखदेव पंडीत, अलका रंगनाथ जंगले.
इतर मागासवर्गीय-
बाळासाहेब बनकर,
मागास प्रवर्ग-
बाळासाहेब परदेशी.
सर्व नुतन संचालकाचे मुळा कारखान्याचे संस्थापक माजी खा. यशवंतराव गडाख व जलसंधारण मंञी ना. शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले आहे.
Comments