अहमदनगर । वीरभूमी - 11-Feb, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यात आज ८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार १२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.९७ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११०७ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८० आणि अँटीजेन चाचणीत १५ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०१, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०३, राहता ०९, संगमनेर ०६, शेवगाव ०१, श्रीगोंदा १२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २५, अकोले ०२, जामखेड ०१, कोपरगाव १०, नगर ग्रामीण १८, नेवासा ०१, पारनेर ०५, राहता ०६, राहुरी ०१, संगमनेर ०७, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १५ जण बाधित आढळुन आले. जामखेड ०३, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०३, पारनेर ०२ आणि राहुरी ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा २९, अकोले ०१, जामखेड ०२, कर्जत ०६, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ११, पारनेर ०९, पाथर्डी ०३, राहाता ०९, राहुरी ०१, संगमनेर ०२, श्रीगोंदा ०४ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:७११२८
उपचार सुरू असलेले रूग्ण: ११०७
मृत्यू:१११५
एकूण रूग्ण संख्या:७३३५०
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
lSehnGQEJPMfi