अहमदनगर । वीरभूमी - 19-Mar, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्हयाच्या रूग्ण संख्येत आज शुक्रवारी 660 ने वाढ झाली. जिल्ह्यातील रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
आज शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 231, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 349 आणि अँटीजेन चाचणीत 80 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 89, अकोले 08, जामखेड 06, कर्जत 18, कोपरगाव 16, नगर ग्रामीण 07, नेवासा 05, पारनेर 08, राहाता 12, राहुरी 01, शेवगाव 13, कॅन्टोन्मेंट 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 119, अकोले 01, जामखेड 01, कर्जत 04, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 18, नेवासा 23, पारनेर 11, पाथर्डी 03, राहाता 59, राहुरी 19, संगमनेर 32, शेवगाव 01, श्रीगोंदा 05 श्रीरामपूर 20 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 80 जण बाधित आढळुन आले. मनपा 30, जामखेड 05, नगर ग्रामीण 01, नेवासा 03, पाथर्डी 19, राहाता 06, राहुरी 07, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात वाढत्या रूग्ण संख्येने चिंता वाढली असून नागरिकांनी नियमाचे पालन करावे. नियमित मास्क वापरावा, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
PQUOTHyzrVKDB