अहमदनगर । वीरभूमी- 17-Apr, 2021, 12:00 AM
अखेर पालकमंत्री यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात सोमवारपासून जनता कर्फ्यू जाहीर करत अनेक बाबींवर निर्बंध आणले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवांसह खाजगी वाहनांसाठी पेट्रोल मिळण्यासाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ निर्धारित केली आहे. तसेच लग्न समारंभावरही बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज रात्री जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर जिल्ह्यामध्ये नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करत कठोर निर्बंध लावण्याचे सांगत याबाबत जिल्हाधिकारी सुधारित आदेश काढतील असे सांगितले होते.
यानंतर शनिवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी यांनी कठोर निर्बंधाचे आदेश काढण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा हद्दीमध्ये रविवार दि. 18 एप्रिलच्या रात्री 12 वाजल्यापासून ते शनिवार दि. 1 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कठोर निर्बंध घातले आहेत.
यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय व अस्थापना बंद असणार आहेत. मात्र काही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी निर्धारित वेळ देण्यात आला आहे. ही वेळ सकाळी 7 ते 11 अशी राहणार आहे.
या आदेशानुसार किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री (फक्त द्वार वितरण), फळे विकी (फक्त द्वार वितरण), अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्रीची दुकाने, कृषी संबधित सर्व सेवा अथवा दुकाने, पशुखाद्य विक्रीची दुकाने, पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांना पेट्रोल/ डिझेल/ सीएनजी/ एलपीजी गॅस विक्री सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवता येणार आहे. तर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, मालवाहतूक या करीता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार सुरू ठेवता येणार आहे.
तर हॉटेल रेस्टॉरंट, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई आहे. मात्र होम डिलेवरी चालु राहील. तसेच धार्मिक स्थळे, आठवडे बाजार, दारु दुकाने पुर्णता बंद राहील. टॅक्सी, कॅब अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील. चार चाकी वाहने अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहतील. दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींसाठी अत्यावश्यक सेवेसाठी वापरास परवानगी राहील. सर्व खाजगी कार्यालये पूर्णपणे बंद राहतील.
कटींग, सलून, स्पा बंद राहतील. शैक्षणिक सनस्था, सर्व खाजगी शिकवणी क्लासेस पूर्णतः बंद राहतील. स्टेडिअम, मैदाने पुर्णतः बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. चहाची टपरी पुर्णतः बंद राहतील. सिनेमा हॉल, नाट्यगृह, संग्रहालय बंद राहतील. सर्व प्रकारची खाजगी बांधकामे पूर्ण बंद राहतील. सेतू, ई-सेवा केंद्र पुर्णतः बंद राहतील. बेकरी, मिठाईची दुकाने बंद राहतील. विवाह समारंभासाठी पूर्णतः बंदी राहील.
हे आदेश मोडणार्यावर144 नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेश दिले आहेत.
Comments