अहमदनगर । वीरभूमी - 09-May, 2021, 12:00 AM
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आज रविवारी 3328 पर्यंत आला आहे. दोन दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असल्याने नगरकरांना दिलासा मिळत आहे. मात्र शनिवारी ज्या तालुक्याचा आकडा कमी होता तो आज पुन्हा वाढला आहे. यामुळे शिवनापाणीचा खेळ सुरूच असल्याचे दिसून येते.
नेहमी सर्वात जास्त आकडेवारी असलेल्या नगरची आकडेवारी शनिवारपासून कमी झाली आहे. ती आज स्थिर राहीली मात्र इतर तालुक्याच्या तुलनेत नंबर एकवरच आहे.
त्याखालोखाल नगर ग्रामीणचा आकडा दुसर्या स्थानावर तर तिसर्या स्थानावर शेवगाव तालुक्याने झेप घेतली असून आजपर्यंतचा सर्वोच्च आकडा 327 वर पोहोचला आहे. त्याखालोखाल राहाता, जामखेड, नेवासा, पारनेर, राहुरी श्रीगोंदा असे क्रमवारी राहीली आहे.
शनिवारी क्रमांक एकवर असलेला संगमनेर व अकोलेची आकडेवारी घटली आहे. अकोले तालुका वगळता इतर तालुक्यांची आकडेवारी वगळता इतर तालुके शंभरच्या पुढे आहेत.
कोरोना सनसर्गाची साखळी तुटण्यासाठी अनेक तालुक्यात कडक लॉकडाऊन असतांनाही अत्यावश्यक सेवा बंद करून जनता कर्फ्यू पाळला जात आहे. मात्र तरीही कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आज रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1220, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1416 तर अँटीजेन चाचणीत 692 असे 3328 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर 421, नगर ग्रामीण 342, शेवगाव 327, राहाता 296, जामखेड 275, नेवासा 213, पारनेर 196, संगमनेर 190, पाथर्डी 175, श्रीगोंदा 167, श्रीरामपूर 167, कोपरगाव 128, कर्जत 109, इतर जिल्हा 66, अकोले 53, भिंगार कन्टेन्मेंट 26, इतर राज्य 04 असे रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू आहे. तरीही या ठिकाणीही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन हतबल होत आहे. मात्र नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घेतले तर कोरोनावर विजय मिळवता येईल, असा विश्वास असल्याने दिलासा मिळत आहे.
gDcMCyTSdu