कोविड सेंटरमधील रुग्णांना नॉनव्हेजची मेजवानी
शेवगाव । वीरभूमी- 29-May, 2021, 12:00 AM
कोरोना उपचारात मांसाहार महत्वाची भूमिका बजावत आहे. कोरोना बाधितांना पौष्टिक आहार म्हणुन अनेक कोविड सेंटरमध्ये मांसाहार दिला जातो.
याप्रमाणे शेवगाव येथील लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील कोविड सेंटरमधील रुग्णांना लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील विचार मंचच्यावतीने पौष्टिक आहाराची (नॉनव्हेज) मेजवानी देण्यात आली.
शेवगाव तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गात योग्य उपचार व दिलासा मिळावा म्हणुन माजी आ. नरेंद्र घुले व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव शहरात लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड सेंटरमध्ये दाखल असणार्या रुग्णांना योग्य उपचाराबरोबर पौष्टिक आहार दिला जातो. तसेच रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
त्याचप्र माजी आ. नरेंद्र घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले व पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते मारुतराव घुले पाटील विचार मंचच्यावतीने पौष्टिक आहार (नॉन व्हेज) देण्यात आला. याचे वाटप रुग्णांना केल्यानंतर त्यांच्या चेहर्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
यावेळी तोफेलभाई शेख, बाजार समितीचे सभापती अॅड. अनिल मडके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कमलेश लांडगे, समीर शेख, ज्ञानेश्वरचे संचालक संतोष पावसे, संतोष जाधव, महेश जाधव, विशाल जोशी, डॉ. पुष्पक शहाणे, शुभम मासाळ, राजू शेख, वहाब शेख आदी उपस्थित होते.
Comments