अकोले । वीरभूमी - 06-Jul, 2021, 12:00 AM
राज्यातील आघाडी नाही तर बिघाडी सरकार असून ते दारूचे दुकाने सुरू करून पवित्र मंदिरे बंद करत आहेत. बंडातात्या कराडकर यांना पायी वारीला जाऊ न देता त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र बंडातात्याने महाराष्ट्रातील वारकर्यांना एक आवाज दिला तर सरकारला पळता भुई थोडी होईल, ते होऊ नये असे वाटत असेल तर बंडातात्यांना मोकळे करून त्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ द्या. अन्यथा पांडुरंग देखील माफ करणार नाही, असे उद्गार भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभवराव पिचड यांनी काढले.
भारतीय जनता पार्टी आध्यत्मिक आघाडीच्या वतीने अकोले येथे बाजारतळा जवळ कोल्हार - घोटी रस्त्यावर अगस्ती मंदिरातून वारकरी टाळ मृदुंगाच्या निनादात उद्धवा अजब तुझे सरकार व धुंद झाला तुझा दरबार या गीत व अभंगाच्या जयघोष करत रस्त्यावर तीन तास भजन गात आघाडी सरकारचा निषेध करत आंदोलन केले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, हभप. दीपक महाराज देशमुख, भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष सौ. सोनाली नाईकवाडी, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, हभप. राजेंद्र नवले, किरण महाराज शेटे, गणेश महाराज वाकचौरे, नितीन महाराज गोडसे, माऊली आरोटे, अमित वाकचौरे, भाजप आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, शहराध्यक्ष सचिन शेटे, सौ. लता देशमुख, विद्या परशुरामी, वैशाली जाधव, बाळासाहेब वडजे, परशराम शेळके, नामदेव निसाळ अगस्ती मंदिराचे ट्रस्टी, तालुक्यातून आलेले सर्व वारकरी, महिला उपस्थित होत्या. प्रसंगी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
हभप. दीपक महाराज देशमुख यांनी बंडातात्या कोण आहेत हेच या सरकारला कळले नाही. उद्धव ठाकरे यांनी बंडातात्या सोबत संपूर्ण शिवसेना उभी राहील असे काही दिवसापूर्वी सांगितले होते. त्याबाबत ऑडियो क्लिप उपस्थितांना ऐकून दाखवत हे सरकार देव धर्माच्या विरोधात आहे. महाराष्ट्रीय जनता त्यांना माफ करणार नाही. या सरकारला भगव्या झेंड्याचे वावडे आहे. अन ठाकरे कुटुंबातील सर्वांनी त्याचा फक्त वापर केला. पवार कुटुंबातील व्यक्ती कडून आम्ही कधी अपेक्षा केली नाही ते काठेवाडीत सुद्धा कधी दिंडीच स्वागत करीत नाही.अशी खरमरीत टीका केली.
सौ. सोनाली नाईकवाडी यांनी बंडातात्या यांच्या माध्यमातून देशातील वारकरी रस्त्यावर येऊन सरकारला जाब विचारील याचे भान ठेवावे इंग्रजापेक्षा हे सरकार जुलमी झालं आहे. तर जालिंदर वाकचौरे यांनी निष्क्रिय सरकार राज्यात आल्याने देव धर्म अडचणीत आले आहेत. तालुक्याचा आमदार मोदींवर टीका करतात. मात्र ज्या मोदींचे पक्षातून तीन वेळा लोकप्रतिनिधी झाले त्याची जाण ठेवा. गळ्यात भगवी शाल पांघरली हा दांभिकपणा आहे.
यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याने तीन तास वाहतूक थंडावली होती.
सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी केले तर युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी आभार मानले.
pPMmLvOtjTgQexI