सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे झाले "दि व्यंकटेश ग्रुप"चे ब्रॅण्ड अम्बॅसेडर.
स्वातंत्र्यदिनी लॉंचींग, बुलंद भारत निर्माणाचे ध्येय.
वीरभुमी- उद्धव देशमुख. 14-Aug, 2021, 12:00 AM
भारताला आत्मनिर्भरतेतून महासत्ता बनायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर रोजगार, उद्योग, व्यवसाय वाढायला हवेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीपासून विविध क्षेत्रात क्रांती घडायला हवी. प्रत्येकाच्या जीवनात संपन्नता यायला हवी असा उदात्त दृष्टीकोन समोर ठेवत प्रत्यक्ष कार्य करणार्या दि व्यंकटेश ग्रुपच्या परिवारात मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अभिनेते सुबोध भावे ब्रॅण्ड अम्बॅसेडरच्या रुपाने सामील झाले आहेत. देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन रविवार दि.१५ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. याच राष्ट्रीय सणाच्या मुहूर्तावर सुबोध भावे यांचे ब्रॅण्ड अम्बॅसेडर म्हणून लॉंचींग होत आहे, अशी माहिती व्यंकटेश ग्रुपचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे यांनी दिली.दि व्यंकटेश ग्रुप ही केवळ आर्थिक उलाढाल करणारी संस्था न राहता बुलंद भारताच्या निर्मितीची भागीदार बनली आहे. संस्थापक अध्यक्ष अभिनाथ शिंदे, सह संस्थापक कृष्णा मसुरे, व्यंकट देशमुख, अनिल गुंजाळ या नवीन विचारांच्या युवकांनी एक मोठं स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जोमाने कार्य चालविले आहे. यात हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक पाठबळ देणे असे काम केले जात आहे.
अर्थ, कृषी, सहकार, सेवा, शैक्षणिक, सामाजिक, इन्फ्रास्ट्रक्चर, मिडिया अशा सर्वच क्षेत्रात हा ग्रुप कार्यरत आहे. ग्रुप अंतर्गत अनेक कंपन्या असून व्यंकटेश मल्टिस्टेटने अत्याधुनिक बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे. यात व्यापार, व्यवसाय, उद्योगांना पाठबळ देतानाच सर्व वर्गाचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचे काम अविरत केले जाते. शहराप्रमाणेच दूर अंतरावर असलेल्या खेड्यांमध्येही अर्थसाक्षरता रुजविण्यात व आधुनिक बँकिंग सेवा देण्यात व्यंकटेश मल्टिस्टेट यशस्वी झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रातही हा ग्रुप सुखायू ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि. या माध्यमातून योगदान देत आहे. शेतकर्यांना कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन मिळावे, कृषी मालाला योग्य भाव मिळावा, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी याबरोबरच शेतकर्यांना मार्केटिंग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत प्रशिक्षण, मार्गदर्शन केले जाते. समाधानी शेतकरीच समृध्द भारताचा पाया असल्याचे मानून सुखायू ऍग्रो कार्यरत आहे.
विकासासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांची निर्मिती अतिशय महत्त्वाची असते. ही बाब लक्षात घेवून व्यंकटेश ग्रुपने हॅबिटस बिल्डवेल प्रा.लि. ही कंपनीही सुरु केलेली आहे. याव्दारे शासकीय तसेच खासगी प्रकल्पांची उभारणी, रस्ते, पूल, पोर्टस, शासकीय इमारती, उद्याने, संग्रहालये, पॉवर प्रोजेक्टस अशी कामे केली जातात. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होत आहे.
व्यंकटेशन ग्रुप सामाजिक बांधिलकीही कायम जपत आला असून व्यंकटेश फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी, युवा, महिला अशा सर्वांच्याच सक्षमीकरणाला दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व उच्च विचार याची कृतीशील सांगड घालत व्यंकटेश फाउंडेशनची टिम अविरत समाजासाठी योगदान देत आहे.व्यंकटेश फाउंडेशनने आपल्या कार्याची सुरुवात गोशाळा स्थापनेपासून केली. कामधेनूच्या सेवेतून समृध्दी कशी येते हे प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर मांडण्यात आले.
महिलांसाठी बिझनेस मॉडेल तयार करून त्याव्दारे त्यांची उन्नती साधली जाते.फाउंडेशनने शालेय दशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये अर्थसाक्षरतेचे बिजारोपण होण्यासाठी विद्यार्थी बचत बँक, विद्यार्थी ग्राहक भांडार सारखे उपक्रम राबविले आहेत. फाउंडेशनने नुकतीच उद्योग क्रांती चळवळही सुरु केलेली आहे. याव्दारे नोकरी मागणारे होण्याऐवजी नोकरी देणारे बना असा मंत्र युवा वर्गात रुजविला जात आहे. यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन, पाठबळ दिले जात आहे.
Comments