भेटीमध्ये शेवगाव-पाथर्डी मतदारसंघासाठी केल्या या मागण्या
पाथर्डी । वीरभूमी- 19-Aug, 2021, 12:00 AM
शेवगाव-पाथर्डी (shevgaon-pathardi) विधानसभा मतदारसंघात कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संभाव्य धोका (Potential danger) विचारात घेऊन आमदार मोनिका राजळे (mla monika rajale)यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांची भेट घेतली.
या दरम्यान पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालय (Sub-District Hospital at Pathardi) व शेवगाव ग्रामीण रुग्णालय (Shevgaon Rural Hospital) येथे प्रत्येकी 50 बेड वाढवून मिळण्याची मागणी केली. तसेच पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे (Primary Health Center at Tisgaon) ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्याची मागणी आ. राजळे यांनी केली.
शेवगाव-पाथर्डी मतदार संघात कोरोना संसर्गाच्या तिसर्या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेऊन आज आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील आरोग्य सुविधाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यामध्ये पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आणखी 50 बेड तर शेवगाव ग्रामीण रुग्णालयात 50 असे 100 बेड मंजूर करण्यात यावेत. तसेच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावेत. आरोग्यविभागात कर्मचार्यांचा स्टाफ वाढविण्याची मागणी करण्यात आली.
तसेच पाथर्डी तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात यावे, अशा मागण्या करत मतदारसंघातील आरोग्या संदर्भातील प्रश्नावर चर्चा करून केलेल्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली.
vhcNqDYFLRpQWl