अहमदनगर । वीरभूमी- 21-Aug, 2021, 12:00 AM
पुढील दि. 21 ते 23 ऑगस्ट या काळात मराठवाडा व विदर्भात जोरदार पाऊस (Heavy rains in Marathwada and Vidarbha) पडणार आहे.
तसेच राज्यात दि. 29 ते 3 सप्टेंबर 2021 या काळात मुसळधार पाऊस पडणार (It will rain heavily) असून दि. 24 ते 28 ऑगस्ट दरम्यान उघडीप मिळणार आहे. यामुळे शेतकर्यांनी मूग काढणी सारखी शेतीची कामे या पाच दिवसात करून घ्यावीत.
त्यानंतर 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस (Heavy rains in some parts of the state) पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डंख (Climate Punjab dak) यांनी व्यक्त केला आहे.
मागील अनेक दिवसापासून पावसात खंड पडला होता. मात्र हवामान अभ्यासक पंजाब डंख यांनी गेल्या चार-पाच दिवसापासून पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. त्या अंदाजानुसार सध्या पाऊस सुरू आहे.
हा पाऊस दि. 23 ऑगस्ट पर्यंत असणार असून त्यानंतर दि. 24 ते 28 ऑगस्ट दरम्यान पाऊस उघडीप देणार आहे. या काळात सूर्यदर्शन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डंख यांनी व्यक्त केला आहे.
पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकर्यांनी मूग काढणीसारखी कामे तातडीने करून घ्यावीत. कारण त्यानंतर पुन्हा सहा दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान अभ्यासक पंजाब डंख यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दि. 21 ते 23 ऑगस्ट पाऊस सुरू राहील. त्यानंतर दि. 24 ते 28 ऑगस्ट हवामान कोरडे राहणार आहे. या काळात शेतकर्यांनी आपली कामे उरकून घ्यावीत.
त्यानंतर दि. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात राज्यातील नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, अहमदनगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तसेच राज्यातील इतर भागातही जोरदार व तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
mrNHMDTecCLFZi