बालविवाह प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल
आरोपीमध्ये मुलीची आई, आजी, मामा व नवरदेवाचा समावेश
शेवगाव । वीरभूमी- 22-Aug, 2021, 12:00 AM
अल्पवयीन मुलीचा विवाह (Marriage of a minor girl) लावून दिल्याप्रकरणी मुलीची आई, आजी, मामा व नवरदेवावर शेवगाव पोलिस (shevgaon police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडीलाने फिर्याद दिली आहे.यातील तीन आरोपी हे शिरुर कासार तालुक्यातील बावी (येळंब) येथील असून आरोपी नवरदेव हा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील आहे. हा गुन्हा चकलंबा पोलिस (Chakalamba Police) ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे लग्न अंदाजे 18 वर्षापुर्वी झालेले असून माझी पत्नी हिचेपासुन मला तीन मुली व एक मुलगा आहे. माझे पत्नीबरोबर किरकोळ कारणावरुन वाद व्हायचे तेव्हा ती मला म्हणायची की, तुमच्याकडे काहीच काम नाही. तुम्ही माझ्या माहेरी चला, असे म्हणायची. तेव्हा मी तीचे माहेरी (येळंब) बावी, ता. शिरुर कासार येथे जायचे नाही असे म्हणालो असता माझी सासु आमच्या घरी आली व माझ्या पत्नीला व मुलांना घेऊन गेली. तेव्हापासुन मुले व माझी पत्नी हे परत माझ्याकडे आलेच नाही. माझी पत्नी सद्या शिक्रापुर - पुणे येथे मुलाबाळांसह राहते. मी हिंगेवाडी येथे माझे वडीलांसोबत राहतो व मजुरीचे काम करुन आमचा दोघांचा उदरनिर्वाह करतो.
माझ्या साडूने दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी मित्राच्या फोनवर मुलगी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केशव उर्फ सोमनाथ पांडुरंग भवर याचे सोबत लग्न करणार असल्याची लग्नपत्रीका पाठविली. त्या लग्नपत्रीकेत दि. 18 ऑगस्ट 2021 रोजी कुढेकर वस्ती, बोधेगाव येथे विवाहस्थळ असल्याचे त्यात नमुद होते. त्याप्रमाणे मी दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी चाईल्ड लाईन यांचा संपर्क क्रमांक 1098 वर फोन करुन अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याबाबत माहिती कळविली होती. त्यानंतर चाईल्ड लाईनचे अधिकारी यांनी मला फोनद्वारे कळविले की, तुमच्या माहितीप्रमाणे आम्ही शेवगाव येथील पोलिसांना कळविले होते व त्याप्रमाणे शेवगाव पोलीस तुम्ही सांगत असलेल्या पत्त्यावर गेले असता त्यांचे घर बंद आहेत, असे त्यांनी मला कळविले होते.
त्यानंतर शेवगाव पोलिसांनी मला कळविले की, दि. 16 ऑगस्ट व 18 ऑगस्ट 2021 रोजी शेवगाव येथील बोधेगाव बीटचे पोलीस अंमलदार तेथील ग्रामसेवकांसोबत लग्नपत्रीकेतील विवाहस्थळी जाऊन खात्री केली. मात्र बालविवाह होत असलेबाबत शेवगाव पोलिसांना माहित झाले आहे. याची कुणकुण लागताच संबंधीत लोकं हे तेथुन कुठेतरी निघुन गेले.
दि. 22 ऑगस्ट 2021 रोजी मला कळाले की, माझ्या मुलीचा बालविवाह हा केशव उर्फ सोमनाथ पांडुरंग भवर (रा. बोधेगाव) याचे सोबत दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी नियोजित ठिकाणी न करता गायकवाडी जळगाव (चकलंबा पोलिस ठाणे हद्द, ता. गेवराई, जि. बीड) येथील अंध अपंगाची शाळा येथे झाला.
याप्रकरणी माझ्या मुलीचा जाणिवपुर्वक बालविवाह हा पत्नी रंजना अंकुश बिलारे (वय 35 वर्ष), मेव्हणा बबलु विष्णू मोरे (वय 32 वर्षे), माझी सासू विजुबाई विष्णू मोरे (वय 62 वर्षे) व केशव उर्फ सोमनाथ पांडुरंग भवर यांनी करून दिला असून यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा हा चकलंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने चकलंबा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
Comments