श्रीगोंदा ग्रामीण । वीरभूमी - 23-Aug, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा (shreegonda) तालुक्यातील जुन्या कडवट शिवसैनिकांनी(Bitter ShivSainik) नवीन तालुकाध्यक्ष (new taluka president) बाळासाहेब दूतारे (balasaheb dutare)यांच्या कार्यपद्धती व निर्णयाविरोधात जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, (bhau koregaonkar) जिल्हा शिवसेना प्रमुख शशिकांत गाडे (shashikant gade) व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम वाकळे (vikram vakale) यांच्या उपस्थितीत कुकडी विश्रामगृहावर झालेल्या कडवट शिवसैनिकांच्या बैठकीत तक्रारी व नाराजीचा सूर काढला.
यावेळी नंदकुमार ताडे, समीर काजी, अनिल हिरडे, शिवाजी दांगडे, नाथाभाऊ पवार, दादासाहेब ढगे, मयूर चव्हाण, ऋषिकेश खरात व संतोष शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींपुढे नव्या पदाधिकार्यांच्या तक्रारी केल्या.
यावेळी बोलताना कार्यकर्ते म्हणाले की, सध्याचे तालुका प्रमुख जुन्या शिवसैनिकांना विचारात न घेता निर्णय घेत आहेत. नुकताच प्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांना पदे वाटण्याचा सपाटा लावला असून पक्ष नियमाप्रमाणे दर महिन्याला पक्षाची बैठक घेतली जात नाही.
मनमानी कारभार करत निर्णय घेतले जात आहेत. जुन्या शिवसैनिकांनी विचारले तर मी करीन ती पूर्वदिशा असे उत्तर मिळत असल्याने अनेक वर्षांपासून शिवसेनेत असलेल्या कडवट कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
या बैठकीला श्रीगोंदा तालुका शिवसेना संघटक नंदकुमार ताडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष शिंदे, युवासेना तालुका संघटक नाथाभाऊ पवार, युवा सेना तालुका उपप्रमुख शिवाजी दांगडे, चोराचीवाडी उपसरपंच दादा चव्हाण, अजित दिंडे, ऋषिकेश खरात, मयूर चव्हाण, अनिल हिरडे, अनिल सुपेकर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दादासाहेब ढगे, घुगलवडगावचे तुषार दांगडे, प्रमोद दांगडे व जुने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
यावेळी बैठकीला आलेल्या जिल्हा नेत्यांना या गोष्टीत लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे.
MLOgrJZbRu