कर्जत । वीरभूमी - 26-Sep, 2021, 12:00 AM
संध्याकाळची 4:55 ची वेळ माजीमंत्री राम शिंदे (ram shinde) कर्जत शहरातून आपला दौरा पूर्ण करत असताना अचानक त्यांची गाडी लोहारगल्ली येथे थांबली. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले (Congress District Vice President Praveen Ghule) यांची नियमित या ठिकाणी बैठक असते. दोघांनी एकमेकांना नमस्कार करत प्रवीण घुले यांनी शिंदे यांना कॉफी पिण्याचे आमंत्रण दिले (Praveen Ghule invited Shinde to drink coffee).
दहाच मिनिटात कॉफी आली. मात्र तो पर्यंत कर्जतच्या राजकारणात घुले आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या एक कप कॉफीची चर्चा शहरात पसरली. या कॉफीने मात्र पुन्हा कर्जतचे स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे, हे मात्र निश्चित.
सध्या भाजपातून मोठ्या प्रमाणात आऊट गोइंग सुरू आहे. मात्र माजी मंत्री राम शिंदे अजून शांत आणि संयमी भूमिका दाखवून त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांच्याशी चर्चा करण्याचा सपाटा लावला आहे. दिवसभर माजीमंत्री शिंदे यांनी शहरातील लोकांच्या गाठी-भेटी घेत आपला जनसंपर्क वाढविण्यावर भर ठेवला आहे.
नुकतेच उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत आपला अधिकृत प्रवेश केला. राम शिंदे यांनी यावर अजून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
शनिवार, दि. 25 रोजी माजी मंत्री राम शिंदे कर्जत शहरात फेरफटका मारत असताना अचानक त्यांची गाडी लोहारगल्ली या ठिकाणी थांबली. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांची या ठिकाणी कायम बैठक असते. यावेळी दोघांनी एकमेकांना नमस्कार करीत बैठक मारली.
घुले यांनी तात्काळ माजी मंत्री शिंदे यांना चहा अथवा कॉफी घेण्याचे आमंत्रण दिले. शिंदे यांनी एक कप कॉफीच घेऊ असे म्हणत आमंत्रण स्वीकारले. अवघ्या दहाच मिनिटात कॉफी आली. माजी मंत्री शिंदे आणि जिल्हा उपाध्यक्ष घुले यांनी कॉफी घेत असतानाच तोपर्यंत शिंदे-घुलेंच्या एक कॉफीची चर्चा अख्या शहरात वार्यासारखी पसरली.
बघता-बघता अनेकांनी घुले आणि शिंदेंची ती एक कप कॉफी आपल्या डोळ्यात देखील कैद केली. कॉफी घेत असताना दोघांमध्ये काय राजकीय चर्चा घडली? हे मात्र समजले नाही. मात्र त्या कॉफीने कर्जतच्या स्थानिक राजकारणात धुराळा उडवला हे मात्र निश्चित.
याच महिन्यात उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी माजीमंत्री राम शिंदे, खा. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डीले आणि प्रवीण घुले यांची राजकीय मैफिल तब्बल एक तास रंगली होती. त्यानंतर आज पुन्हा निव्वळ योगा-योग की, राऊत यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानानंतर काही नवी समीकरणे जुळण्याच्या तयारीची मैत्री पूर्ण कॉफी होती. हे येणारा काळच सांगू शकेल.
Comments