अहमदनगर । वीरभूमी- 03-Oct, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन 500 ते 800 दरम्यान कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे. यामुळे 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित असलेल्या गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील तब्बल 61 गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापणा दि. 4 ऑक्टोबर ते दि. 13 ऑक्टोबर पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन 500 ते 800 च्या दरम्यान कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे. यामुळे ज्या गावांमध्ये 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित आहेत अशा गावांमध्ये जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे.
यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 11 तालुक्यातील 61 गावांचा समावेश आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील तब्बल 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.
लॉकडाऊन जाहीर झालेल्या गावांमध्ये अकोले - लिंगदेव, वीरगाव, परखतपूर. कर्जत - खांडवी, बाभूळगाव दुमाला. कोपरगाव - गोधेगाव. नेवासा - कुकाणा. पारनेर - वडनेर बु., कान्हुरपठार, गोरेगाव, दैठणेगुंजाळ, जामगाव, भाळवणी.
पाथर्डी- तिसगाव. राहाता- भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, कोर्हाळे, लोणी बु., लोणी खु., कोल्हार बु. संगमनेर- गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बु., आश्वी खु., पारेगाव बु., पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगावपान, सायखिंडी.
शेवगाव- भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाण बु. श्रीगोंदा- लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी. श्रीरामपूर- बेलापूर खु., उक्कलगाव, कारेगाव. अशा 11 तालुक्यातील 61 गावांमध्ये जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे.
वरील 61 गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापणा दि. 4 ऑक्टोबर ते दि. 13 ऑक्टोबर पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
तसेच या गावांमध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. तसेच इतर क्षेत्रातून येणार्या नागरिकांस आगमन व प्रस्थान करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र कृषी माल व आवश्यक वस्तू वाहतुकीस परवानगी असून इतर वाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे.
xhtXALTjCKdFHqu