अहमदनगर । वीरभूमी- 14-Oct, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आजही घट झाली आहे. बुधवारच्या तुलनेत आज एकुण कोरोना बाधितांच्या आकडेवारीत एकने घट झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण 318 कोरोना बाधित आढळले आहेत.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीत पुन्हा संगमनेर पहिल्या क्रमांकावर आले आहे. बुधवारच्या तुलनेत संगमनेरसह कर्जत, पारनेर, नगर शहर, पाथर्डी, इतर जिल्हा येथील आकडेवारीत वाढ झाली आहे. वाढत्या आकडेवारीने काही अंशी चिंता व्यक्त केली जात आहे.
हळु हळु अहमदनगर जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. बुधवारी जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्णांच्या संख्येत शंभरने घट झाल्याने अॅक्टिव रुग्णांची संख्या 2 हजार 575 वर आली आहे. आतापर्यंत तब्बल 3 लाख 41 हजार 344 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 82, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 200 तर अँटीजेन चाचणीत 36 असे 318 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 65, कर्जत 36, पारनेर 27, नगर ग्रामीण 23, राहाता 20, राहुरी 18, नगर शहर 16, नेवासा 16, शेवगाव 16, इतर जिल्हा 15, पाथर्डी 15, अकोले 12, श्रीगोंदा 11, कोपरगाव 10, श्रीरामपूर 09, जामखेड 07, मिलटरी हॉस्पिटल 02 असे कोरोना बाधित आढळून आले.
मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत घट होत असल्याने दिलासा मिळत आहे. नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
KkoHQxlp