अकोले । वीरभूमी- 25-Nov, 2021, 10:56 PM
तालुका कार्यक्षेत्र असणार्या अकोले येथील प्रवरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली.
सर्वसाधारण मतदारसंघात अगस्ती कारखान्याचे संचालक बाळासाहेब ताजणे, ज्येष्ठ कार्यकर्ते संतुमामा भरीतकर, अकोल्यातील प्रसिद्ध व्यवसायिक संजय झुंबरलाल भळगट, अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष रामनाथ शिंदे, कोतुळ येथील संजय बाळासाहेब गीते, लहानु किसन मंडलिक यांची बिनविरोध निवड झाली.
ओबीसी मतदार संघातून संस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन भास्कर रामभाऊ मंडलिक यांची बिनविरोध निवड झाली. विमुक्त जाती - जमती मतदारसंघातून बांधकाम व्यवसायिक हिम्मत दशरथ मोहिते यांची तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात भागवत रघुनाथ त्रिभुवन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महिला राखीव मतदार संघात सौ. रंजना एकनाथ मंडलिक, सौ. मनीषा प्रफुल्ल ताजणे यांची बिनविरोध निवड झाली.
अकोल्याचे सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र साळवे, सहाय्यक निवडणूक अधिकारी व संस्थेचे व्यवस्थापक शिवाजीराव भुजबळ यांनी काम पाहिले. संस्थेचे कर्मचारी बाळासाहेब झोळेकर, भाऊसाहेब जाधव, सुरेश मंडलिक यांनी त्यांना सहाय्य केले.
अगस्ती कारखान्याचे संचालक गुलाबराव शेवाळे यांचे हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. अकोले तालुक्यात पतसंस्थामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठे अर्थकारण चालते. पतसंस्था चळवळ वाढली आणि टिकली पाहिजे, असे सांगत प्रवरा पतसंस्थेने तालुक्यात 30 वर्षात चांगले काम उभे केले, असे गुलाबराव शेवाळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
निवडणुकी कामी सहकार्य करणार्या सर्वांचे यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक संतू मामा भरीतकर, बाळासाहेब ताजने, सुरेश शिंदे, संस्थेचे व्हाईस चेअरमन भास्कर मंडलिक, सोन्याबापु मंडलिक यांनी आभार मानले. यावेळी बाळासाहेब गायकवाड, भाऊसाहेब गीते, सुनील गीते, नंदू गीते, संतोष गीते, श्रीषिकेश गीते आदी उपस्थित होते.
KSCzvVtosLmUc