शेवगाव । वीरभूमी- 03-Jan, 2022, 04:44 PM
शेवगाव तालुका व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव शाखेच्या वतीने देण्यात येणा-या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पत्रकारीता क्षेत्रातील योगदानाबद्दल पत्रकार सुनिल आढाव, निळकंठ कराड, अनिल कांबळे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
तसेच विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल गटविकास अधिकारी महेश डोके, उदयोजक गिरीष साठे, विस्तार अधिकारी शैलेजा राऊळ, चाँद शेख, राम उगलमुगले, सचिन खेडकर, उर्जा फाऊंडेशन, ऋषिकेश जोशी, ईशांत वाघ आदींना विशेष पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास बुधवंत व सचिव राजू घुगरे यांनी दिली.
शेवगाव तालुका व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दर्पणकार बाळशास्त्री जाभेकर यांची जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व प्रशासकीय, सामाजिक, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना त्या क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार दिले जातात.
यावर्षी तालुक्यातील पत्रकारीता क्षेत्रातील आतापर्यंतच्या योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रा.सुनिल आढाव, निळकंठ कराड, अनिल कांबळे यांना जीवनगौरव, तर महापूर संकट व कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी करणारे गटविकास अधिकारी महेश डोके, शिक्षण विस्तार अधिकारी शैलेजा राऊळ, कोरोना काळात तालुक्यातील गरजू कुटूंबाना मदत करणारे उदयोजक गिरीष साठे, दिव्यांगांसाठी काम करणा-या सावली संस्थेचे अध्यक्ष चाँद शेख, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काम करणा-या उचल फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन खेडकर, मुकबधीर मुलांसाठी विदयालय चालवणारे राम उगलमुगले, वृक्षारोपनासाठी योगदान देणारी उर्जा फाऊंडेशन व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल कुस्तीपटू ऋषिकेश बंडू जोशी व राष्ट्रीय खो- खो खेळाडू ईशांत किरण वाघ आदींना विशेष पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कार्यक्रमात आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे, जिल्हा परीषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे व ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शेवगाव येथील स्वराज मंगल कार्यालयात गुरुवात ता.६ रोजी सकाळी १० वाजता होणा-या या कार्यक्रमासाठी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे. असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments