प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणुन डॉ. दादासाहेब काकडे यांच्याकडे पदभार
शेवगाव । वीरभूमी- 27-Feb, 2022, 04:46 PM
प्रहार जनशक्ती पक्षाची शेवगाव तालुका कार्यकारीणी व इतर आघाड्यांवरील कार्यकारीणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
शेवगाव तालुका कार्यकारीणी बरखास्त केल्यानंतर प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणुन डॉ. दादासाहेब काकडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी यांनी पत्रात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील सर्व प्रहार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची रविवार दि. 20 फेब्रुवारी 2022 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ही बैठक होऊ शकली नाही.
बैठक होऊ न शकल्यामुळे वेळेचा अभाव लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने प्रहार जनशक्ती पक्ष शेवगाव तालुक्यातील सर्व आघाड्यांवरील कार्यकारणी दिव्यांग पदाधिकारी वगळता बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लवकरच आवश्यक ते फेरबदल करून नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत प्रहार जनशक्ती पक्ष शेवगाव प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणुन डॉ. दादासाहेब काकडे हे काम पाहतील, असे पत्रात म्हटले आहे.
या पत्राच्या प्रती तालुका अध्यक्ष संदीप बामदळे, शेवगाव-पाथडीर विधानसभा अध्यक्ष रामजी शिदोरे, शेतकरी तालुका अध्यक्ष संजय नाचण यांना पाठविल्या आहेत.
ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारणी बरखास्त केल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
PEMhBNKXcRCbAtf