पाथर्डी । वीरभूमी - 08-Dec, 2022, 03:52 PM
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 नगर ते पाथर्डी रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने पाथर्डी शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पुकारण्यात आला. नागरिक व व्यापारी वर्गाने या बंदला उस्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनाला पाठिंबा दिला.
महाविकास आघाडी सोबतच वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनीही या आंदोलनाला व बंदला पाठिंबा दिला आहे.
सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या संपर्क कार्यालयापासून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, शिवसेना (ठाकरे) तालुकाप्रमुख भगवान दराडे, मा. नगरसेवक डॉ. दीपक देशमुख, चांद मनीयार, उबेद आतार, शहराध्यक्ष योगेश रासने, वैभव दहिफळे, आक्रम आतार, आतिश निर्हाळी, बाळासाहेबांची शिवसेनाचे तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे, वंचित बहुजनचे अरविंद सोनटक्के,
चंद्रकांत भापकर, मुन्ना खलिफा, महेश दौंड, आनंद सानप, किशोर डांगे, सुनील दौंड, गणेश दिनकर, युसुफ खान, जुनेद पठाण, आकाश काळोखे, मोहम्मद खान, सचिन नागपुरे, संदीप राजळे, अनिकेत निनगुरकर, विनय बोरुडे, संतोष जीरेसाळ, अविनाश पालवे यांनी शहरातून फेरी काढत व्यापार्यांना आपली आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
सर्व स्तरातील व्यापार्यांनी यास उत्स्फूर्तपणे साथ देत दुकाने बंद ठेवली व आमदार लंके यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविला.
राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, युवा नेते ऋषिकेश ढाकणे, माजी नगरसेवक बंडूपाटील बोरुडे, माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ हे आ. निलेश लंके यांच्यासोबत नगर येथे आंदोलनात थेटपणे सहभागी आहेत.
pWRHiVNFCeJBGf