92 हजार रूपयांचा दंड व 1 महिन्याचा साधा कारावास । दंड न भरल्यास अतिरिक्त 1 महिने कारावास
अहमदनगर । वीरभूमी- 29-Dec, 2022, 03:13 PM
अहमदनगर येथील श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या बोधेगाव शाखेला कर्जदाराने दिलेला 87 हजार 400 रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालय क्र. 10 अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. देशमुख यांनी 92 हजार रूपयांचा दंड व 1 महिन्याचा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
दंड न भरल्यास आरोपीस अतिरिक्त 1 महिन्याचा कारावास शिक्षा सुनावली आहे. पिराजी जगन्नाथ मासळकर (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) असे शिक्षा झालेल्या कर्जदाराचे नाव आहे.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पिराजी जगन्नाथ मासळकर यांनी श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट. सोसायटीच्या शेवगाव शाखेतुन दि. 5 मार्च 2020 रोजी 90 हजार रुपयाचे कर्ज व्यवसाय वाढीसाठी घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदार यांनी श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट लि. यांना 87 हजार 400 रुपयाचा बोधेगाव येथील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचा धनादेश दिला होता.
हा धनादेश श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसा लि. यांनी त्यांचे खाते असलेल्या बँकेत भरला असता तो वटला नाही. त्यामुळे श्री. व्यंकटेश मल्टीस्टेटने कर्जदार यांना वेळोवेळी लेखी व तोंडी पैसे भरण्यास सांगुन देखील कर्जदार पिराजी जगन्नाथ मासळकर यांनी पैसे भरले नाहीत.
त्यामुळे श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट यांनी वकिला मार्फत कर्जदार यांना नोटीस पाठवली. परंतु कर्जदार यांनी नोटीसीला प्रतिसाद दिला नाही. म्हणुन श्री. व्यंकटेश मल्टीस्टेटने कर्जदाराविरूद्ध अहमदनगर येथील न्यायालयात केस दाखल केली.
सदर केसवर सुनावणी झाली असता विशाल गोरे यांनी पुरावे सादर केले. या पुराव्यांची पडताळी केल्यानंतर कर्जदार यांनी संस्थेची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले. या सुनावणी अंती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. देशमुख यांनी कर्जदार आरोपी यास 92 हजार रुपयांचा दंड व 1 महिण्याचा कारावास व दंड न भरल्यास आरोपीस अतिरीक्त 1 महिण्याचा कारावास, अशी शिक्षा सुनावली.
फिर्यादी संस्थेतर्फे अॅड. सुरज खंडीझोड, अॅड. किरण जाधव व अॅड. कविता उदमले यांनी काम पाहीले.
tjCFXpnw