19 कोटी निधी देवून सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला
आ. आशुतोष काळे । सुरेगाव ग्रामपंचायत वर्धापनदिनानिमित्त आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार
कोपरगाव । वीरभूमी - 25-Feb, 2023, 01:03 AM
कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच सुरेगावच्या विकासाचे प्रश्न सोडवून नागरिकांना आवश्यक असणार्या सोयी-सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील विकासाच्या बाबतीत सर्वोतोपरी सहकार्य केले जात आहे. हि परंपरा पुढे सुरु ठेवून सुरेगावच्या नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठी 19 कोटी रुपये निधी देवून सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
सुरेगाव ग्रामपंचायतीच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित सुरेगाव व परिसरातील नागरिकांसाठी दिनांक 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शेवटच्या दिवशी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सुरेगावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येवून चित्रकला, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव वाबळे होते. यावेळी हवामान तज्ञ पंजाबराव डख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, ग्रामपंचायतीचा वाढदिवस साजरा करून गावाच्या विकासात योगदान देणार्या आजी माजी सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्याची संकल्पना स्वागतार्ह आहे. त्यामुळे निश्चितपणे गावाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांना प्रेरणा मिळून सुरेगावचा सर्वोतोपरी विकास होवून सुरेगाव ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर जाईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित नागरिकांना हवामानाचा गोषवारा मांडताना हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून वृत्तपत्रात 2023 दुष्काळ पडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र शेतकर्यांनी चिंता करण्याचे कार नाही मागील वर्षीप्रमाणेच 2023 ला देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याची गोड बातमी दिली. मागील काही वर्षापासून हवामान खात्याच्या पुढे असणार्याहवामान तज्ञ पंजाबराव डख यांचे हवामानाचे अंदाज तंतोतंत खरे ठरत असल्यामुळे उपस्थित शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.
अनेकांना आजपर्यंत चक्रीवादळाचे नाव माहित व्हायचे मात्र हे नाव कशामुळे दिली गेली याचा खुलासा हवामानाबाबत सखोल विश्लेषण करतांना त्यांनी सांगितला. एल-निनो व ला-निनो हे स्पॅनिष भाषेतील शब्द आहेत. एल-निनो चक्रीवादळ तयार झाल्यास दुष्काळ पडतो व ला-निनो चक्रीवादळ तयार झाल्यास मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्याच बरोबर मुंबईकडून जर पाऊस आला तर त्यावर्षी नगर जिल्ह्यात पाऊस कमी होतो व जर हाच पाऊस पूर्वेकडून आला तर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाऊस होतो.
त्यामुळे नगरजिल्ह्यातील सर्वांनी वरून राजाला पूर्वेकडून येण्यासाठी प्रार्थना करावी असे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडी राहणार असून मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढणार असून हवामान कोरडे राहणार आहे मात्र 5 मार्च नंतर राज्यात पुन्हा हवामान खराब होणार आहे. 5 तारखेनंतर विदर्भ व पूर्व विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज असून त्याची काही अंशी झळ बसण्याची शक्यता असून काढणीला आलेला गहू, हरबरा लवकरात लवकर काढून घ्या असा सल्ला दिला व यावर्षी दिवाळीमध्ये देखील पाऊस राहणार असल्याचा अंदाज सांगितला आहे.
यावेळी परमपूज्य श्री गोवर्धनगिरी महाराज, जिल्हा उद्योग अधिकारी अतुल दवंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वाल्मिकराव कोळपे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब, गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे संचालक सुदामराव वाबळे, बन्सी निकम, ज्ञानेश्वर हाळनोर, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सिकंदरपटेल, दगु गोरे, मोहनराव वाबळे, पंढरीनाथ जाधव, उद्योजक रणजित वाबळे, पांडुरंग ढोमसे, नामदेव कोळपे, भाऊसाहेब कदम,
राजेंद्र निकम, जगनराव गोरे, नवनाथ गोरे, कैलास कदम, सुहासराव वाबळे, पं.स. विस्तार अधिकारी तोरणे, रविंद्र देवकर, अंबादास धनगर, शहाजापुरचे सरपंच सचिन वाबळे, मढीचे सरपंच प्रविण निंबाळकर, राहुल जगधने, प्रथम लोकनियुक्त सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर, तसेच सर्व सदस्य आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
wdhGlJQMUzYAvjFf