अहमदनगर शिक्षक जिल्हा प्राथमिक परिषदेची मागणी
अहमदनगर । वीरभूमी - 08-Jan, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त प्राथमिक शिक्षकांना मतदानापासून वंचित न ठेवता त्यांच्या मुळ गावातील ग्रामपंचायत निवडणुकांत मतदान करण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे पोस्टल बॅलट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अहमनगर शिक्षक जिल्हा प्राथमिक परिषदेने केली आहे.
शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके यांनी याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांना नगर येथे दिले. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणूक कामी शिक्षक कर्मचार्यांना मतदान केंद्रावर निवडणुकीचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत लागत असल्याने त्यांच्या मुळ गावी मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
पर्यायाने असे कर्मचारी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू शकतात. याबाबत स्थानिक पातळीवर तहसीलदार यांच्याकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे मतदानापासून शिक्षक वंचित राहू नये यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीतील शिक्षक कर्मचार्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे पोस्टल बॅलेट उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
Nolan Vazquez