राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही
नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीची पाहणी; प्रशासन आणि ठेकेदारांची तातडीने बैठक घेण्याच्या सूचना
नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेत त्यांनी प्रशासनाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच येत्या दोन दिवसांत प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांची बैठक घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नगर-मनमाड महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे तसेच चिंचोली फाटा ते कोल्हार या मार्गावरही वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहनांची संख्या वाढली असून, त्यातच वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरी फॅक्टरी येथे थांबून वाहतूक परिस्थितीची पाहणी केली.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच वाहनांची ये-जा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ते वाहतूक नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याशी चर्चा करून वाहतूक व्यवस्थापनाबाबत आवश्यक सूचना केल्या.
दरम्यान, सकाळपासूनच डॉ. सुजय विखे पाटील यांचे सहकारी आणि पोलीस प्रशासन वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्नशील होते. वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी आणि प्रवाशांना दिलासा मिळावा, यासाठी वाहतूक नियंत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
मात्र, वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. यासाठी येत्या दोन दिवसांत प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांची बैठक घेऊन वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनचालक आणि प्रवाशांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.