Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार

काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे

संभाजी रोहकले यांच्या नेतृत्वाखाली नाराज गटाची पत्रकार परिषद । नियुक्ती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, प्रदेशाध्यक्षांकडेही राजीनाम्यांची प्रत

पारनेर । वीरभूमी - Oct 11, 2026 • 11:37 PM 1 views
अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये नूतन पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून अंतर्गत वाद उफाळून आला आहे. बाबुर्डी गावचे सरपंच ड. ईश्वर दिवटे यांची पारनेर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने नाराज झालेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी पारनेर येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या घडामोडींमुळे तालुक्यातील काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

काँग्रेस संघटनेच्या पुनर्बांधणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यात पारनेर येथे पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान अ‍ॅड. ईश्वर दिवटे यांची नूतन तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही नियुक्ती करताना माजी तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले तसेच विविध सेलच्या पदाधिकार्‍यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आक्षेप नाराज गटाने घेतला आहे. नियुक्तीची प्रक्रिया आणि तिच्या अधिकृततेबाबतही पदाधिकार्‍यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

पत्रकार परिषदेला संभाजी रोहकले, कार्याध्यक्ष सुरेश मेसे, अल्पसंख्याक सेलचे उस्मानगनी इनामदार, युवक अध्यक्ष योगेश शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाध्यक्षांना सादर केलेल्या राजीनामा पत्रात नियुक्ती प्रक्रियेबाबत अनेक मुद्दे मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील एका तालुक्याचा अपवाद वगळता अन्य तालुकाध्यक्ष बदलण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. मात्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर या नियुक्त्यांचा उल्लेख नसल्याचे नाराज पदाधिकार्‍यांनी निवेदनात नमूद केले आहे.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष पक्षाचे प्राथमिक सदस्य नसल्याचा तसेच ते यापूर्वी पक्षाच्या बैठका आणि कार्यक्रमांत सहभागी झाले नसल्याचा दावाही नाराज गटाने केला आहे. जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता नियुक्ती करण्यात आल्याने संघटनेत नाराजी निर्माण झाल्याचे पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

या नियुक्तीमागे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांचा आग्रह असल्याचा आरोप नाराज पदाधिकार्‍यांनी केला आहे. तसेच, नियुक्ती प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाणीबाबत चर्चा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, या आरोपांना पुष्टी देणारी स्वतंत्र माहिती उपलब्ध नाही. नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता राखली नसल्याचा आरोप करत संभाजी रोहकले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आपापल्या पदांचे राजीनामे सादर केले असून ते मंजूर करण्याची विनंती केली आहे. या राजीनामा पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनाही पाठवण्यात आली आहे.

पारनेरमधील या घडामोडींमुळे काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. नाराज पदाधिकार्‍यांची समजूत काढण्यासाठी पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात, राजीनामे स्वीकारले जातात का आणि या वादावर तोडगा निघतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply