Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी

जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके

दहशत आणि दादागिरीला भीक घालणार नाही; सर्वसामान्यांच्या ताकदीवर विजय मिळविला

पारनेर । वीरभूमी - Nov 03, 2026 • 11:54 PM 2 views
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्व प्रस्थापित शक्ती एकवटल्या असतानाही सर्वसामान्य मतदारांच्या पाठबळावर विजय मिळविला. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांना बँकेत न्याय मिळवून देणार असून, दहशत आणि दादागिरीच्या राजकारणाला भीक घालणार नाही, असा निर्धार खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

जिल्हा सहकारी बँकेतील विजयानंतर पारनेर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. निवडणुकीतील संघर्ष, विरोधकांचे प्रयत्न, पोलिस प्रशासनाचा वापर आणि बँकेतील कथित अनियमितता यावर त्यांनी परखड भूमिका मांडली.

लंके म्हणाले, सर्वसामान्यांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हीच विजयाची खरी ताकद आहे. चक्रव्यूह भेदून आपण विजयी झालो असून, पैशांचे आमिष दाखवूनही मतदारांनी स्वाभिमान कायम ठेवला. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहिले. माझे कोणाशीही वैर नाही; मात्र गद्दारी करणे आपल्या स्वभावात नाही. ‘जो टायगर होता है, वो अकेला आता है,’ असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

बँकेचे ठराव सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि पोलिस प्रशासनाचा वापर करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. अधिकाऱ्यांनी कोणाचीही लाचारी पत्करू नये. नीलेश लंकेही गृहमंत्री होऊ शकतो, हे लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला. प्रकाश गाजरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली; तरी त्यांनी मतदारांचे संपर्क क्रमांक पाठवून निष्ठा कायम ठेवली. छुपे डाव खेळण्यापेक्षा समोरून वार करा, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.

पारनेरच्या स्वाभिमानाचा उल्लेख करताना लंके म्हणाले, हा सेनापती बापटांचा तालुका आहे. झुकणारा किंवा स्वाभिमान विकणारा नाही. रावणाचे राज्य संपून रामराज्य आले, तसे पारनेरमध्येही रामराज्य आले आहे. दादागिरी आणि दहशत मला शिकवू नका. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला घरी पाठविले असून, आगामी निवडणुकीतही आपणच खासदार होणार आणि सत्ता आल्यानंतर मंत्री होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्तेचा गैरवापर होत असून, समाजमाध्यमांवर स्टेटस ठेवल्याबद्दलही गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मतांसाठी एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखविण्यात आले होते. आता त्यांनी प्रवेश देऊन दाखवावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. निवडणुकीत मदत करणाऱ्या विविध पक्षांतील कार्यकर्त्यांची नावे उघड करणार नसल्याचे सांगत, तालुक्यात परकीय शक्तींना शिरकाव करू देऊ नका, असे आवाहन केले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असून, त्यांचा हिशोब चुकता केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे; मात्र ती ठराविक लोकांचा अड्डा बनल्याचा आरोप लंके यांनी केला. काही कारखानदारांना शेकडो कोटींची कर्जे, अनियमितता, मनमानी आणि हातउसणे पैसे देण्याचे प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. बँकेचा कारभार सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताचा करण्यासाठी प्रयत्न करणार असून, गरीब कुटुंबातील मुलांनी उद्योजक व व्यावसायिक व्हावे, यासाठी कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

बँकिंगचा अभ्यास करून रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार कर्जवाटप आणि नियमांनुसार वसुली केली पाहिजे. हातउसणे पैसे घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. बँकेतील अनियमितता आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आपण बँकेत गेलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही नियोजनबद्ध पद्धतीने शंभर टक्के विजय मिळविण्याचे लक्ष्य असल्याचे लंके यांनी सांगितले. पारनेरच्या जनतेने दाखविलेला विश्वास कायम राखून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply