अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ
माहूरगडाहून आणलेल्या पायी ज्योतीचे जल्लोषात स्वागत । नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
साडेतीन शक्तिपीठांपैकी माहूरगड निवासीनी श्री रेणुका मातेचे प्रतिरूप म्हणून लौकिक प्राप्त केलेल्या आणि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानात विधिवत घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
घटस्थापनेनिमित्त श्री रेणुका परिवारातील 30 भाविकांनी श्रीक्षेत्र माहूरगडाहून पायी ज्योत आणली. तालुक्यात आगमन होताच ठिकठिकाणी या ज्योतीचे स्वागत करण्यात आले. अमरापूरपासून देवस्थानापर्यंत बँड पथकाच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणूक काढण्यात आली.
ज्योत देवस्थानात दाखल झाल्यानंतर श्री रेणुका भक्तानुरागी डॉ. प्रशांत नाना भालेराव, पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, माजी नगराध्यक्षा व लोकनियुक्त पहिल्या महिला नगराध्यक्षा जनाबाई घोडके, शिवसेना नेते अरुण मुंढे आणि शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माया मुंढे या मान्यवरांच्या हस्ते पायी ज्योत आणणार्या भाविकांची पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविकांना महावस्त्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
रविवारी सकाळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व श्री रेणुका भक्तानुरागी डॉ. प्रशांत नाना भालेराव, वेदशास्त्रसंपन्न सच्चिदानंद देवा देशपांडे, तुषार देवा आणि देवस्थानच्या ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत आईसाहेबांचे पुण्याहवाचन, मातृकापूजन व महारुद्राभिषेक करण्यात आला. सुवर्णालंकारांनी देवीला अलंकृत करून विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर आईसाहेबांना पायसाचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. याचवेळी शतचंडी यागास प्रारंभ करण्यात आला.
नवरात्रोत्सवात दररोज सकाळी 11.30 वाजता महाआरती, सायंकाळी 4 वाजता संगीतराजोपचार, सायंकाळी 6.30 वाजता सायंआरती, रात्री 7 वाजता श्रींची स्तुतिवचने व अष्टके आणि रात्री 8 वाजता श्रींची छबिना मिरवणूक असे नियमित कार्यक्रम होणार आहेत.
रविवार, दि. 11 रोजी श्रीविग्रह महाभिषेक, महापूजा, घटस्थापना आणि श्री सप्तशती पाठारंभ करण्यात आला. पुढे प्रत्येक माळेला श्री सप्तशती पाठासह श्रींचे कुंकुमार्चन, हरिद्रार्चन, ऐलार्चन, पुष्पार्चन, शमी अर्चन, हिरण्यार्चन आणि बिल्वार्चन असे धार्मिक विधी होणार आहेत.
गुरुवार, दि. 15 रोजी पाचव्या माळेनिमित्त भगवतीभक्त चंद्रकांत भालेराव दादा यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त सकाळी 10 वाजता तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांचे जाहीर प्रवचन होणार आहे. बुधवारी दुपारी 12 वाजता रेडिओ स्टार राधिका ताई व मुक्ताताई उबाळे यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याशिवाय अंबिका महिला भजनी मंडळ, ईशानी महिला भजनी मंडळ (पाथर्डी), अमरापूर भजनी मंडळ आणि चितळी भजनी मंडळ यांच्यासह पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांचे कार्यक्रम दररोज होणार आहेत.
सोमवार, दि. 19 रोजी श्री सप्तशती पाठ व नवरात्र होमास प्रारंभ होईल. दुपारी 4 वाजता नवरात्र होमाची पूर्णाहुती, रात्री 8 वाजता महानैवेद्य आणि रात्री 9 वाजता महाआरती होणार आहे.
मंगळवार, दि. 20 रोजी श्रींची महापूजा व महाआरती, सकाळी 9 वाजता ह.भ.प. राम महाराज हिंजुर्के यांचे जाहीर हरिकीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता भगवान श्री परशुराम पालखी मिरवणूक सोहळा व सीमोल्लंघन होणार आहे. नवरात्रोत्सवातील सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भगवतीभक्तानुरागी मंगलताई चंद्रकांत भालेराव यांनी केले आहे.