Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ

कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती l दीड कोटींच्या पुतळ्याने कोल्हारच्या वैभवात पडणार भर

अहिल्यानगर । वीरभूमी - Oct 17, 2026 • 02:58 PM 3 views
कोल्हार-भगवतीपूर परिसरातील शिवप्रेमींच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार असून, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असून, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात जय्यत तयारी सुरू असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन सुमारे दीड कोटी रुपये खर्चून हा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. नगर-मनमाड महामार्गालगत कोल्हार बसस्थानकाच्या प्रांगणात उभारण्यात आलेला हा पुतळा परिसराच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे.

अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने प्रसिद्ध गायक अभिजीत जाधव यांचा ‘शिवशंभो गर्जना’ हा प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून शिवकालीन गीतांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा सादर केली जाणार आहे.

याशिवाय, कोल्हार-लोणी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून कार्यक्रमस्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. फटाक्यांची आतषबाजी, मावळे आणि शिवकालीन सरदारांच्या वेशभूषेतील युवकांचे सादरीकरण तसेच जिवंत देखाव्यांमुळे मिरवणुकीला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होणार आहे.

दरम्यान, कोल्हार-भगवतीपूर परिसरातील प्रमुख रस्ते भगव्या पताकांनी सजविण्यात येत असून, ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. शिवप्रेमी युवक, ग्रामस्थ आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून सोहळ्याचे नियोजन सुरू आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply