Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील

ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील

५३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ : प्रतिकूल परिस्थितीत सामूहिक प्रय

नेवासा । वीरभूमी - Oct 12, 2026 • 04:15 PM 128 views
यंदाच्या गळीत हंगामात लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी आणि कामगारांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५३व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी (दि. १२) सकाळी १०.३० वाजता झाला. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, संत ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ॲड. देसाई देशमुख आणि कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर आयोजित सभेत घुले पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे संचालक प्रसाद पटारे व सौ. गौरी पटारे तसेच बॉयलर अटेंडंट संजय नवले व सौ. वैशाली नवले यांच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आले. संचालक जनार्दन शेळके व सौ. शांताबाई शेळके यांच्या हस्ते ऊस गव्हाण पूजन करण्यात आले. शेतकी ओव्हरशीअर शरद गव्हाणे व सौ. शिल्पा गव्हाणे यांच्या हस्ते ऊस वजनकाट्याचे विधिवत पूजन करण्यात आले.

नरेंद्र घुले पाटील म्हणाले, “अल निनोचा परिणाम सर्व देशावर झाला असून त्याला आपणही अपवाद नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाताना एकमेकांना प्रेरणा देत आपल्यातील कौशल्य आणि गुणवत्तेचा वापर या सहकारी संस्थेसाठी जास्तीत जास्त कसा करता येईल, हे आता आपल्या हातात आहे. १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.”

ते पुढे म्हणाले, “कोणी कुठेही वजन केले तरी आपल्या वजनकाट्यावरील ऊस वजनात एक किलोचाही फरक पडणार नाही, इतकी अचूकता आपल्या वजनकाट्यात आहे.” पश्चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविल्यास कमी खर्चात गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे नगर, नाशिकसह मराठवाड्यातील दहा जिल्ह्यांचा दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यास मदत होईल, असेही घुले पाटील यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग आणि माजी संचालक ॲड. देसाई देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी कारखान्याचे माजी संचालक काशिनाथ नवले, पद्माकर मते, शिवाजीराव कोलते, सखाराम लव्हाळे, विष्णू जगदाळे, रावसाहेब निकम, ज्ञानदेव दहातोंडे, चंद्रकांत गरड, विद्यमान संचालक डॉ. नारायण म्हस्के, पंडितराव भोसले, अशोकराव मिसाळ, दत्तात्रय काळे, जनार्दन कदम, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, ॲड. हिम्मतसिंह देशमुख, अमोल अभंग, विकास नन्नवरे, संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, तज्ज्ञ संचालक रवींद्र नवले, कामगार संचालक सुखदेव फुलारी, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे आणि जनरल मॅनेजर रविंद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.

माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, डॉ. शिवाजी शिंदे, मोहनराव गायकवाड, गणेश गव्हाणे, नामदेव निकम, बलभीम फुलारी, किसन यादव, संदीप फुलारी, संभाजीराव माळवदे, शेषराव साबळे, बाबूलाल पटेल, दत्तात्रय माळवदे, जनार्दन कदम, भानुदास कावरे, काकासाहेब लबडे, रामदास काळे, नारायण गढेकर, दादा गजरे, बाळासाहेब वाघडकर, अंबादास गोंडे, दत्तात्रय खाटीक, अशोक दुकळे, संभाजी आगळे, बाबासाहेब आगळे, राजू परसय्या, दत्तात्रय विधाटे, आप्पासाहेब देशमुख, सुदाम खाटीक, राम घुमरे, आबासाहेब ताकटे, गोरक्षनाथ बर्गे, संभाजी पवार, दादासाहेब वाबळे, बाबासाहेब आगळे, संतोष म्हस्के, हरिभाऊ नवले, अशोक मेरड, किशोर मिसाळ, ॲड. रवींद्र गव्हाणे, पुरुषोत्तम सर्जे, सोपान महापूर, भारत गुंजाळ, विनोद ढोकणे, सुभाष म्हस्के, शरद मिसाळ, शंकर निकम, हनुमान पातकळ, गणेश खंबरे, भाऊसाहेब चेके, शहादेव खोसे, तुकाराम विघ्ने, दिलीप कुंढारे, विश्वनाथ मते आणि पोपट मते उपस्थित होते.

तसेच कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, तांत्रिक सल्लागार एम. एस. मुरकुटे, एस. डी. चौधरी, महेंद्र पवार, भगवंता शेंडगे, सुधाकर ढाकणे, वर्क्स मॅनेजर राहुल पाटील, चीफ इंजिनिअर नंदकुमार चोथे, चीफ केमिस्ट सतीश शिंदे, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के, मुख्य लेखापाल रामनाथ गरड, पर्यावरण अधिकारी राजेश वावरे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, लीगल ऑफिसर सुनील शिंदे, राजेंद्र काकडे, नामदेव मुळे, विवेक जगदाळे यांच्यासह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.

कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे पाटील यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले. संचालक रामनाथ राजपुरे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply