Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व

दहा जागांचे निकाल जाहीर; २१ संचालकांची निवड पूर्ण, अध्यक्षपदासाठी चुरस

अहिल्यानगर । वीरभूमी - Nov 03, 2026 • 03:19 PM 684 views
जिल्हा सहकारी बँकेच्या दहा जागांसाठी सोमवारी झालेल्या मतदानात 85.44 टक्के मतदान झाले. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत सर्व जागांचे निकाल जाहीर झाले. सोसायटी मतदारसंघातून पारनेरमध्ये खासदार निलेश लंके, राहुरीत आमदार प्राजक्त तनपुरे, अकोल्यात संजीवनी शिंदे आणि कर्जतमध्ये ज्योती शिंदे विजयी झाले.

शेतीपूरक मतदारसंघातून आमदार आशुतोष काळे, महिला राखीव मतदारसंघातून अनुराधा नागवडे व संगीता वाघ, इतर मागास प्रवर्गातून कारभारी जावळे, तर भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून गणपतराव सांगळे विजयी झाले. निकालानंतर समर्थकांनी जल्लोष केला.

यापूर्वी सोसायटी मतदारसंघातून आमदार मोनिकाताई राजळे, आमदार अक्षय कर्डिले, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, ज्येष्ठ नेते बिपिनदादा कोल्हे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले पाटील, माजी संचालक करण ससाने, रणजीत देशमुख आणि दत्तात्रय पानसरे यांच्यासह जामखेडमधून सचिन घुमरे बिनविरोध निवडून आले होते. बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांचीही बिनविरोध निवड झाली होती.

जिल्हा बँकेच्या 11 जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित दहा जागांसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सभापती राम शिंदे गटाला दोन, लंके-लोखंडे यांच्या परिवर्तन आघाडीला एक, तर विखे-थोरात-गडाख यांच्या सहकार विकास आघाडीला 18 जागा मिळाल्या आहेत.

सर्व 21 संचालकांची निवड पूर्ण झाल्याने आता जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड कोणाच्या बाजूने होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत महिला संचालकांची संख्या वाढल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत महिलांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मतमोजणीत उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे- अकोले मतदारसंघात संजीवनी शिंदे - 49 विजयी, आ. किरण लहमटे- 36 पराभूत, राहुरी मतदारसंघ- आ. प्राजक्त तनपुरे 89 विजयी, सत्यजित कदम- 18 पराभूत, पारनेर मतदारसंघ- खा. निलेश लंके-63 विजयी, राहुल शिंदे-40 पराभूत, कर्जत मतदारसंघ- ज्योती शिंदे-54 विजयी, तुषार पिसाळ-20 पराभूत अशी आहेत.

शेतीपुरक मतदारसंघ- आ. आशुतोष काळे- 750 विजयी, सुधीर म्हस्के- 124 पराभूत. महिला राखीव मतदारसंघ- अनुराधा नागवडे- 2625 विजयी, संगीता वाघ- 2283 विजयी, हर्षदा काकडे- 1468 पराभूत, संध्या महाडुंळे-497 पराभूत. अनुसुचित जाती-जामाती मतदारसंघ- वैभवराव पिचड- 2687 विजयी, प्रशांत लोखंडे- 1087 पराभूत आणि विमुक्त जाती- भटक्या जमाती मतदारसंघात गणपतराव सांगळे- 2461 विजयी, ऋषिकेश ढाकणे- 1290 पराभूत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply