Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध

विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील l भाजपच्या ‘विकसित भारत संकल्प सभे’त पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीचा गौरव

अहिल्यानगर । वीरभूमी - Oct 08, 2026 • 10:45 AM 3 views
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २५ वर्षांची राजकीय कारकीर्द संकल्प, संघर्ष आणि राष्ट्रसेवेला समर्पित राहिली आहे. विश्वमान्य नेतृत्व म्हणून जगभरात त्यांचा गौरव होत असून, विकसित भारताची वाटचाल साध्य करताना विरासत आणि विकास यांचा योग्य समन्वय त्यांनी साधला आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वाटचालीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी जिल्ह्याचे प्रभारी लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, आमदार अक्षय कर्डीले, आमदार विवेक कोल्हे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सभेनंतर शहरातून ‘सेवा ज्योत यात्रा’ काढण्यात आली. विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून महाविशाल गणपती मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “२५ वर्षांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या राजकीय कारकीर्दीचा नाही, तर संकल्प, संघर्ष, संघटन, विकास आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयाचा प्रवास आहे.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकापासून सुरू झालेला प्रवास देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचला. प्रत्येक पदाच्या जबाबदारीत प्रशासन, विकास आणि जनसहभाग केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा आदर्श मोदी यांनी निर्माण केला, असे विखे पाटील यांनी सांगितले.

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हा मंत्र केंद्रस्थानी ठेवून गरीब, शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग, उद्योजक आणि समाजातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

जनधन योजनेपासून डिजिटल व्यवहारांपर्यंत, तसेच घरकुल योजनेपासून आयुष्मान भारत योजनेपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य घटकांना लाभ मिळवून देत अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणण्यात आला. त्यामुळे सामान्य माणूस देशाच्या विकासप्रक्रियेशी जोडला गेला, असे विखे पाटील म्हणाले.

मोबाईल बँकिंग, डिजिटल पेमेंट, सरकारी सेवा आणि ऑनलाइन व्यवहार सर्वसामान्यांच्या हातात आले असून, यूपीआय ही भारताच्या डिजिटल क्षमतेची जगभरात चर्चिली जाणारी ओळख बनली आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारत अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न झाले. स्टार्टअप, संरक्षण उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारताची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होत आहेत. युवकांच्या कौशल्याला संधी देण्यासाठी ‘स्किल इंडिया’, तर महिलांच्या सहभागाला विकासाची शक्ती बनविण्यासाठी ‘नारीशक्ती’चा विचार पुढे आला आहे. बदलता भारत आणि जगभरातील भारताची बदलती प्रतिमा मोदी यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावी झाली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पासून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीपर्यंत, तिहेरी तलाकविरोधी कायद्यापासून कलम ३७० हटविण्याच्या निर्णयापर्यंत विविध घटनांचा उल्लेख करत त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वातील विकासप्रवासाचा गौरव केला. विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध व्हावे, असे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply