Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध

अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील l दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत भेट

अहिल्यानगर । वीरभूमी - Oct 08, 2026 • 10:39 AM 3 views
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यातील जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.

मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना अण्णा हजारे यांची यापूर्वी भेट घेतली होती. उपचारानंतर ते पुन्हा राळेगणसिद्धी येथे परतल्याचे समजल्यानंतर पारनेर येथील टंचाई आढावा बैठक आटोपून मंत्री विखे पाटील यांनी गावातील यादवबाबा मंदिरात त्यांची भेट घेतली. यावेळी विनायक देशमुख, सुजित झावरे आणि अशोकराव सावंत उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाली. शासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहितीही विखे पाटील यांनी अण्णा हजारे यांना दिली.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. गावागावांत पाणी अडवणे, पाणी जिरवणे, नाला खोलीकरण, बंधारे उभारणे, गाळ काढणे तसेच उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन यावर सातत्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून भूजलपातळी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे आवश्यक आहे. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता लोकसहभागातून व्यापक चळवळ उभी राहिली पाहिजे, असेही अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.

राळेगणसिद्धीमध्ये यापूर्वी झालेली जलसंधारणाची कामे, वृक्षलागवड आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आजही गावातील वनराई टिकून असल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले.

“आजची दुष्काळी परिस्थिती ही भविष्यातील जलव्यवस्थापनाचे धडे देणारी आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे आणि जिरविण्यासाठी गावपातळीवर नियोजन करून जलसंधारणाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे,” हा अण्णा हजारे यांचा विचार शासन कृतीत उतरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर आणि लोकसहभाग या तीन बाबींना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक गावात कामे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply