पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर पशुसंवर्धन विभागाचा तालुकानिहाय आराखडा l ६४ हजार पशुपालकांकडून माहिती संकलित
टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने तालुकानिहाय सर्वेक्षण सुरू केले असून, जिल्ह्यातील ६४ हजार पशुपालकांकडून पशुधनाची माहिती संकलित करण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार टंचाईच्या परिस्थितीत चारा उत्पादनाचे नियोजन करण्यासाठी ‘अहिल्यानगर पॅटर्न’ तयार करण्यात येत असून, यामुळे पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात टंचाई आढावा बैठका घेतल्या. या बैठकीत चारा टंचाईबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. पशुधनाची उपलब्ध आकडेवारी, चारा उत्पादनाचे नियोजन आणि बियाणे वाटपातील त्रुटी लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या.
या आराखड्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पशुपालकांची संख्या, पशुधनाची संख्या, चारा उत्पादन करणारे शेतकरी, चाऱ्यासाठी मागणी करणारे शेतकरी तसेच शासनाच्या योजनेतून मोफत बियाणे घेऊन चारा उत्पादन करण्यास इच्छुक शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विशेष प्रारूप तयार करण्यात आले आहे.
पावसाअभावी यंदाचे चारा पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे टंचाईच्या काळात पशुधनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने चारा उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी वेळोवेळी दिल्या आहेत.
पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ तसेच क्षेत्रीय अधिकारी संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. अहिल्यानगर जिल्हा दूध उत्पादनासाठी राज्यातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक असून, जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. त्यामुळे टंचाईच्या विविध परिस्थितीत चारा उपलब्धतेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
पशुसंवर्धन विभागाने यापूर्वी पशुधनाची गणना करून जनावरांचे टॅगिंग केले आहे. त्यामुळे जनावरांच्या नोंदी उपलब्ध असून, नव्या सर्वेक्षणातून त्यांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. यामुळे पशुधनाची अचूक संख्या, चाऱ्याची मागणी आणि भविष्यातील नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यास मदत होणार आहे.
चारा उत्पादनासाठी हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, अशी आग्रही भूमिका पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. टंचाई आढावा बैठकीत त्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला असून, पशुसंवर्धन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर हायड्रोफोनिक्सद्वारे चारा उत्पादनाची सुरुवात करावी, यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.