‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले!
दुष्काळग्रस्त कळसपिंपरीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची दिवाळी; विद्यार्थ्यांना फराळ, फटाके वाटप
‘घरी दिवाळीचा फराळ केला का? नवे कपडे, फटाके आणले की नाही?’ या प्रश्नांना कळसपिंपरी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मूकपणे नकारार्थी उत्तरे दिली. एका विद्यार्थ्याला जवळ घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा तेच प्रश्न विचारले. त्यावेळी अत्यंत निरागसपणे हातवारे करत सार्थक राठोड या विद्यार्थ्याने बोबड्या बोलांत, ‘आमच्याकडे पैसेच नाहीत,’ असे उत्तर दिले. त्याच्या या उत्तराने दुष्काळाची तीव्रता बालमनावर किती खोलवर रुजली आहे, याची जाणीव उपस्थितांना झाली.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी विद्यार्थ्यांना फटाके, फळे आणि फराळाचे साहित्य दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रत्येक मंत्र्यांनी टंचाईग्रस्त भागात दिवाळी साजरी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. टंचाईच्या परिस्थितीत शासन सर्व पातळ्यांवर सक्रिय असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, यासाठी संवाद साधण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.
त्यानुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी सायंकाळी कळसपिंपरी येथे विद्यार्थी, ग्रामस्थ आणि महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. भीमसेन भवार यांच्या घरी जाऊन त्यांनी स्वतः पणती पेटवली. दुष्काळी संकटाने चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबाला सहानुभूतीच्या शब्दांत धीर दिला. तेथेच पिठलं-भाकरीचे जेवण करत सुख-दुःखाच्या गप्पा मारल्या. या दौऱ्यामुळे दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना दिलासा मिळाल्याचे आणि त्यांच्या मनावरील ताण काहीसा हलका झाल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी आमदार मोनिका राजळे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, गटविकास अधिकारी राजेंद्र धस, वृद्धेश्वरचे संचालक राहुल राजळे, अजय रक्ताटे, संभाजी वाघ, दिगंबर भवर, कार्यकर्ते, प्रमुख अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण टंचाईग्रस्त भागातील नागरिकांशी एकाच वेळी संवाद साधणे शक्य नसल्याने प्रातिनिधिक स्वरूपात टंचाईग्रस्त कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी विखे पाटील यांनी जायकवाडी योजनेसह पाणीटंचाई, चारा परिस्थिती आणि जलसंधारणाचा आढावा घेतला. राक्षी येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
संकटाच्या प्रसंगी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. हा विश्वास देण्यासाठी कळसपिंपरी येथे दिवाळी साजरी करून संवाद साधल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. गणेशनगर तांडा येथेही मान्यवरांनी फराळ आणि फटाके वाटून रहिवाशांशी संवाद साधला.
पालकमंत्र्यांच्या अचानक दौऱ्यामुळे विविध प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळाली. बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या हद्दीवरील घाटशील पारगाव मध्यम प्रकल्पाच्या बीड जिल्ह्यातील भागात चारा उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून प्रश्न सोडवला. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील चारा समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. प्रश्नांचे गांभीर्य आणि गरज ओळखून जागेवर निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीमुळे सणासुदीच्या दिवसांतही प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसून आले.
चौकट : सार्थकच्या वेदना समजून घेण्याची गरज
‘आमच्याकडे पैसेच नाहीत,’ असे उत्तर देणाऱ्या सार्थकच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. कष्ट करून जगताना कुटुंबाची होणारी घालमेल बालमनाला सुन्न करणारी ठरली आहे. कुटुंबात पैसे नसणे हेच सर्व समस्यांचे कारण असल्याचा निष्कर्ष या बालकाने काढला. त्याचे बोबडे बोल ऐकून उपस्थितांनाही दुष्काळाची दाहकता अधिक तीव्रतेने जाणवली. ज्या कुटुंबात जेवण केले, त्या कुटुंबातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आणि सार्थक राठोडसारख्या कुटुंबांना सक्रियपणे भरीव मदत मिळाली, तर विखे-राजळे यांच्या दौऱ्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.

Tags
#Ahilyanagar,
#Pathardi,
#Kals
#Pimpri,
#Guardian
#Minister
#Radhakrishna
#Vikhe
#Patil,
#Monika
#Rajale,
#Drought
#Relief,
#Diwali
#Celebration,
#Sarthak
#Rathod,
#Tribal
#and
#Rural
#Students,
#Diwali
#Faral
#Distribution,
#Farmers’
#Issues,
#Water
#Scarcity,
#Fodder
#Crisis,
#Maharashtra
#Government,
#Social
#Responsibility,
#Rural
#Development,
#Ahilyanagar
#News