Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार

खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’

पंतप्रधान मोदींच्या कुटुंबीयांवरील वक्तव्याचा निषेध; कर्जत ऊर्जा प्रकल्प आणि चारा टंचाईवरही राधाकृष्ण विखे पाटलांची भूमिका

अहिल्यानगर । वीरभूमी - Oct 26, 2026 • 04:04 PM 8 views
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबीयांच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेले विधान हे वैफल्यग्रस्त भावनेतून आले असून, काँग्रेसला सर्वच स्तरांवर येत असलेल्या अपयशाची ही केविलवाणी कबुली असल्याची टीका जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

माध्यमांशी बोलताना डॉ. विखे पाटील यांनी खरगे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले की, राजकारणामध्ये काही सभ्यता आणि संकेत पाळले जाणे अपेक्षित आहे. मात्र, ज्येष्ठ नेत्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य केले जाणे दुर्दैवी आहे. राजकीय विरोधाच्या नावाखाली इतक्या खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करणे ही काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीची परिसीमा असल्याचेही त्यांनी म्हटले.

काँग्रेस पक्षाला सर्वच स्तरांवर अपयश येत असून, देशातील जनतेने वेळोवेळी दिलेला पराभवाचा कौल अद्यापही काँग्रेसला पचविता आलेला नाही, असा दावा विखे पाटील यांनी केला. विविध मुद्द्यांवर आंदोलने करून तसेच वेगवेगळ्या माध्यमांचा आधार घेऊनही काँग्रेसला जनतेचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने वैफल्यातून अशी वादग्रस्त वक्तव्ये केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबीयांबद्दल अपमानकारक भाषा देशातील जनता सहन करणार नाही, असा दावा करत राजकारणातील संकेत मोडणाऱ्यांना जनता थारा देणार नाही, असेही डॉ. विखे पाटील यांनी म्हटले.

कर्जत ऊर्जा प्रकल्पावरही विखे पाटलांची भूमिका :
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील ऊर्जा प्रकल्पाचा मूळ विषय समजून न घेता त्यावर राजकीय भाष्य करणे योग्य नाही, असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासंदर्भातील भूमिका स्पष्टपणे मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जत येथे सुरू होणाऱ्या आधुनिक ऊर्जा प्रकल्पामुळे राज्याच्या वीजविषयक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला. प्रकल्पामुळे स्थानिक पर्यावरणाला धोका निर्माण होणार नसल्याचे सांगताना नियोजित क्षेत्रापेक्षा दुप्पट वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चारा टंचाईवर ‘हायड्रोपोनिक्स’ तंत्रज्ञानाचा वापर :
जिल्ह्यातील चारा टंचाईच्या उपाययोजनांबाबत माहिती देताना डॉ. विखे पाटील यांनी पशुधनासाठी चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्याचे सांगितले.

चाऱ्याला जिल्हाबंदी केल्यामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होत असतील, तर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कमी पाण्यात आणि कमी जागेत पौष्टिक चारा उपलब्ध करून देणाऱ्या ‘हायड्रोपोनिक्स’ तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मितीला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा टंचाई निधीतून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply