आधुनिक जिजाऊ आणि सुसंस्कृत पिढीची जबाबदारी
- सौ. आशा सुधीर साठे, सैनिकपत्नी, अहिल्यानगर
आज आपण पाहतो की महिला उच्चशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात त्या गगनभरारी घेत कमवत आहेत. हे सर्व मान्य आहे आणि महिला घेत असलेली ही गगनभरारी कौतुकास्पद आहे. पण सखे, आज मनातील हितगुज करायचे आहे गं मला तुझ्याशी.
सखे, एक सांगू तुला-सध्याचा काळ आपण पाहतो, तो खूप भयानक आहे. या लेखाद्वारे मी तुझे खच्चीकरण तर मुळीच करणार नाही. पण आताच्या या काळामध्ये तुझ्या लेकरांना चांगले संस्कार देऊन त्यांना समाजातील एक चांगला भावी नागरिक घडवण्यासाठी घरामध्ये तुझी त्यांना जास्त गरज आहे.
मान्य आहे, महागाई भरमसाठ वाढली आहे. एकट्या बाबांच्या पगारावर घर चालवणे शक्य नाही. शिक्षणाचा खर्च न पेलवणारा आहे, त्यामुळे घर चालवण्यासाठी दोघांनी नोकरी करणे आणि कमावणे गरजेचे आहे. पण एक सांगू-सध्याचा काळ पाहता या लेकरांना, चिमुरड्यांना एका आईची घरात खूप जास्त गरज आहे. लहानपणापासून तू त्यांना घरात राहून चांगले संस्कार शिकवले, वाईट गोष्टींपासून दूर राहायला शिकवले, तर ते त्यांना त्यांच्या जीवनात एक चांगला नागरिक म्हणून जगण्यासाठी फायदेशीर ठरेल. ही तू दिलेली संस्कारांची शिदोरी त्यांना शेवटपर्यंत पुरेल.
आणि हो, मोबाईलपासून त्यांना सतत दूरच ठेव बाई. तुला त्या चिमुरड्याने त्रास देऊ नये म्हणून मोबाईल नावाचं त्याच्या आयुष्याला, शिक्षणाला उध्वस्त करणारे खेळणे तर मुळीच त्याला देऊ नकोस. त्यापेक्षा त्याला मैदानी खेळ खेळण्यासाठी एखाद्या मैदानात घेऊन जात जा. वाचनालयामध्ये जाऊन त्याच्यामध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण कर. बालवयात तू त्याला जेवढ्या चांगल्या सवयी सोबत राहून लावशील, त्या त्याला त्याचं आयुष्य जगताना खूप उपयोगी येतील.
पण पैसा कमवण्यासाठी तू देखील जर घराबाहेर पडली, तर या लेकरांकडे नक्कीच दुर्लक्ष होईल. आज आपण समाजात जीवन जगताना पावलोपावली वाईट गोष्टी घडताना पाहत आहोत. मोबाईलमुळे जग नको त्या गोष्टी समोर पाहून विकृत बनत चालले आहे. सर्वात जास्त चिमुरड्या लेकींना, कोवळ्या कळ्यांना डोळ्यात तेल घालून आपल्याला या विकृत समाजापासून सुरक्षित ठेवून जिवापाड जपायचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी जसे घडवले, तसे लक्ष आपल्याला आपल्या मुलांकडे द्यायचे आहे. राजमाता जिजाऊ नसत्या, तर शिवबा घडले नसते आणि स्वराज्य निर्माण झाले नसते. म्हणजेच मुलांसाठी आई किती महत्त्वाची असते, हे आपल्याला जिजाऊंनी दाखवून दिलेले आहे.
आजच्या आधुनिक जिजाऊलाही उद्याची भावी उज्ज्वल पिढी घडवण्यासाठी, सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागणार आहे. आधुनिक युगातील उच्चशिक्षित महिलांचे घराकडे दुर्लक्ष होत आहे. काही जणी रील्स बनवणे, भिशी पार्टी यामध्येच पुरत्या गुंतून गेलेल्या असतात. नक्कीच तुम्ही तुमचे छंद जोपासा, फिरायला जा; पण घराकडे, परिवाराकडे, आपल्या माणसांकडे दुर्लक्ष होईल असे वागू नका.
आपण पाहतो, हल्ली दोघांच्या विचारांमध्ये ताळमेळ राहिलेला नसल्यामुळे कुटुंब विखुरले जात आहे. त्याचा परिणाम विशेषकरून लहान मुलांवर जास्त होताना दिसून येत आहे. संसारामध्ये पूर्वी तडजोड होताना दिसून येत होती. कुठेतरी थांबायला हवे असे दोघांना वाटायचे आणि पुन्हा ते नव्याने संसाराला सुरुवात करायचे.
आता पैसा भरमसाठ झालाय माणसाकडे. त्यामुळे दोघेही अहंकारात जगताना दिसून येत आहेत. कमीपणा कुणालाच घ्यायचा नसतो. ‘मीपणा’ अंगी ठासून भरल्यामुळे तो नाते टिकवण्यात आडवा येत आहे. मुलीसुद्धा कोर्टकचेरीला जास्त प्राधान्य देऊन दावा दाखल करून मुलाकडून भरमसाठ पैसा वसूल करायला प्राधान्य देतात; पण तडजोड नकोच म्हणतात.
पूर्वी मुली खूप सासुरवास सहन करायच्या. आजही अनेक ठिकाणी मुलींना छळाला सामोरे जावे लागत आहे; पण पुरुषांनीही त्यांच्या मर्यादेत राहायला हवे. कारण सासुरवास सहन करणारी ती स्त्रीजात आता राहिलेली नाही. तिला तिचे हक्क आणि अधिकार कळायला लागले आहेत. त्यामुळे तिचा आदर, मान-सन्मान करायला शिका. तरच तुमच्या घराला घरपण देणारी, तुमच्या घराची शोभा वाढवणारी लक्ष्मी तुमच्या घरात टिकून राहील.
काळ खूप बदलला आहे आणि आगामी येणारा काळ हा खूप भयंकर असणार आहे. त्यामुळे दोघांनीही कुटुंबव्यवस्था टिकावी यासाठी एकमेकांचा आदर करायला शिकावे. मतभेद झालेच, तर ते दोघांमध्येच शांततेत चार भिंतींच्या आत मिटवायला हवेत. पण कोर्टकचेरीची पायरी चढण्याची वेळ कधी आयुष्यात येऊ देऊ नका.
आणि हो, आजच्या आधुनिक जिजाऊ-तुझ्या चिखलाच्या गोळ्याला घडवण्यासाठी, त्याला समज येईपर्यंत तरी तुझी त्याला घरी गरज आहे. घरातील नको त्या गरजा कमी करा, आर्थिक नियोजन अचूक करा-बरोबर संसाराचे गणित अचूकपणे सोडवता येईल. दोघांनीही अहंकार, गर्व, मीपणा सोडून दोघांच्याही आईवडिलांचा आदर करायला शिका. कारण आजच्या या युगात घरामध्ये मुलांकडे लक्ष देणारे आजी-आजोबा हे प्रत्येक घरात असायलाच हवेत. आजची परिस्थिती पाहता घरात पैसा जास्त येतोय, पण घरात माणसं मात्र कमी होत चालली आहेत.
आवर्जून भेट घ्यायला जाणारी माणसं आता राहिली नाहीत. संवाद कमी होत चालला आहे. मोबाईल-वेडी दुनिया झाली आहे सगळी. त्यामुळे माणूस माणसाशी बोलेनासा झाला आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत, त्या केवळ माणसाचा माणसाशी कमी होत चाललेल्या संवादामुळे आणि अतिप्रमाणात मोबाईल वापरामुळे.
प्रत्येकाने फक्त आपला परिवार चांगला, सुसंस्कृत घडवण्यासाठी प्रयत्न केले, तर आपोआप सारा समाज सुसंस्कृत होईल. पहा, पटतंय का थोडंतरी मनाला...
शब्दांकन : सौ. आशा सुधीर साठे
सैनिकपत्नी, अहिल्यानगर
9604056928

Tags
##Modern
#Jijau
##culture
##culturedgeneration
##parenting
##mother'srole
##familysystem
##children'sculture
##Marathiarticle
##socialawareness
##womenpower
##parentalresponsibility
##childculture
##mobileaddiction
##mentalhealth
##familyvalues
##Indianculture
##culturedsociety
##readingculture
##parentingtips