Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी

पळवे खुर्द शिवारात लक्झरी बस, कंटेनर, एसटी आणि कारची धडक । नशिब बलवत्तर म्हणुन मोठी दुर्घटना टळली

अहिल्यानगर । वीरभूमी - May 14, 2026 • 11:02 PM 2019 views
नगर-पुणे महामार्गावरील पळवे खुर्द शिवारात गुरुवारी सकाळी भीषण साखळी अपघात झाला. हा अपघात लक्झरी बस, कंटेनर, एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झाला. या अपघातात आळंदी येथे विवाहासाठी निघालेल्या वर्‍हाडी मंडळींसह सुमारे 30 ते 35 जण जखमी झाले. नशिब बलवत्तर म्हणुन किरकोळ जखमा वगळता सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील राजळे कुटुंबातील विवाह सोहळा गुरुवार दि. 14 रोजी आळंदी येथे होता. यानिमित्त सकाळी कासार पिंपळगाव येथून वर्‍हाडी घेवून लक्झरी बस नगर-पुणे महामार्गाने आळंदीच्या दिशेने जात होती. लक्झरी बस करंजी, नगर, सुपा मार्गे पळवे टोल नाका ओलांडून मठ वस्तीवरील घाणेगाव रोडलगत असलेल्या हॉटेल जय मल्हारसमोर जालना येथून पुण्याकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार (एमएच 20 जीई 1784) अचानक लक्झरी बसला कट मारत पुढे गेली.

मागून येणार्‍या लक्झरी बस (क्रमांक एमएच 16 डीके 6051) च्या चालकाने कारला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि लक्झरी बस थेट रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने पुण्याहून नगरकडे येणार्‍या कंटेनर (क्रमांक एचआर 38, एडी 0068) वर आदळली.

लक्झरी बस आणि कंटेनरच्या धडकेनंतर महामार्गावर अचानक वाहने थांबली. त्याचवेळी कंटेनरच्या मागून नगरकडे येणारी एसटी बसही वेगात येऊन कंटेनरला धडकली. या अपघातात एसटी बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताला कारणीभूत ठरलेली स्विफ्ट डिझायर कार मात्र रस्त्यालगतच्या शेतामध्ये जाऊन थांबली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, सुपा पोलिस आणि मदत पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर तुटलेल्या काचा आणि वाहनांचे विखुरलेले अवशेष पाहून परिसर सुन्न झाला होता. जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी पाच रुग्णवाहिकांच्या सहाय्याने सुप्यातील निरामय हॉस्पिटल आणि दत्त हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, काही जखमींना डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.

या भीषण अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. जवळपास दोन तासांनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

लक्झरी बस आणि कंटेनरमधील धडक अत्यंत भीषण होती. या अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. धडकेचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. लक्झरी बस आणि कंटेनरचे चालक वाहनांमध्ये अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही चालकांना बाहेर काढले. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. मात्र नशिब बलवत्तर होते म्हणुन किरकोळ जखमा वगळता सर्व सुखरुप असल्याचे समजते. जखमींवर सुपा येथे प्राथमिक उपचार करुन नगर येथे हलविण्यात आले. तेथे किरकोळ जखमींवर उपचार करुन घरी सोडण्यात आले तर चार ते पाच जणांवर उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पारनेर येथे कार्यक्रमात व्यस्त असलेले खासदार निलेश लंके यांनी थेट सुप्यातील रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून सर्व जखमींना तातडीने आणि योग्य उपचार मिळतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच जखमी वर्‍हाडी मंडळींच्या नातेवाईकांनाही धीर दिला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply