Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान

आ. राजळे गटाच्या 17 जागा बिनविरोध । निवडणूक बिनविरोधची परंपरा खंडीत

पाथर्डी । वीरभूमी- Jun 19, 2026 • 01:00 PM 2504 views
तालुक्याची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती सभासदांनी निवडून द्यावयाचे प्रतिनिधी मतदारसंघातून कासार पिंपळगाव गटातील दोन जागेसाठी तीन अर्ज राहिल्याने येथे मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिली. तर कासार पिंपळगाव गट वगळता इतर मतदारसंघातील 17 जागा बिनविरोध निवडून आणण्यात सत्ताधारी आ. मोनिका राजळे यांच्या गटाला यश आले आहे.

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यावेळी खंडीत झाली आहे. कारखान्याच्या 19 जागांसाठी 26 मे 2026 पासून निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची 18 जून पर्यंत मुदत होती. सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती सभासदांनी निवडून द्यावयाचे प्रतिनिधी मतदारसंघातून कासार पिंपळगाव गटातील दोन जागेसाठी सत्ताधारी गटातून आप्पासाहेब दादाबा राजळे, उद्धव रघुनाथ वाघ व विरोधी गटाचे शिवशंकर अर्जुन राजळे यांचे अर्ज राहील्याने येथे 26 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 5 यावेळी मतदान होणार आहे. तर 27 जून 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी गटाकडून मोठे प्रयत्न झाले.

कासार पिंपळगाव गट वगळता बिनविरोध निवडून आलेल्या संचालक पुढील प्रमाणे- सर्वाधारण उत्पादक व्यक्ती सभासदांनी निवडून द्यावयाचे प्रतिनिधी मतदारसंघातून चितळी गट- सुभाष बाबुराव ताठे, अनिल शिवाजी फलके. कोरडगाव गट- श्रीकांत एकनाथ मिसाळ, नारायण लक्ष्मण काकडे, बाबासाहेब रंगनाथ किलबिले. पाथर्डी गट- रामकिसन काशिनाथ काकडे, सुभाष मारुती बुधवंत. मिरी गट- यशवंत निवृत्ती गवळी, सुरेश एकनाथ आठरे. टाकळीमानूर गट- शेषराव सुर्यभान ढाकणे, बाळासाहेब भगवान गोल्हार यांचा समावेश आहे.

तर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था व बिगर उत्पादक संस्था मतदार संघातून राहुल आप्पासाहेब राजळे, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून काकासाहेब मुरलीधर शिंदे, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून सिंधूबाई महादेव जायभाये, मोनिका राजीव राजळे, इतर मागास वर्गीय मतदारसंघातून बापुसाहेब पाराजी पाटेकर, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून संदीप बाजीराव लोखंडे असे एकुण 17 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

यावेळी सत्ताधारी गटाकडून सुरेश आठरे, बापुसाहेब पाटेकर व संदीप लोखंडे या नवीन चेहर्‍यांना संधी दिली असून उर्वरीत सर्व विद्यमान संचालक आहेत. कारखाना निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणुन प्रांताधिकारी प्रसाद मते हे काम पहात असून त्यांना तहसीलदार उद्धव नाईक, नायब तहसीलदार सानप आदी सहाय्यक म्हणुन काम पहात आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply