Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध

घुले बंधूंवर सभासदांनी दाखवला विश्वास । यावेळीही बिनविरोधची परंपरा कायम

नेवासा । वीरभूमी- Jun 19, 2026 • 02:02 PM 827 views
तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली आहे. पुन्हा एकदा कारखाना सभासदांनी नरेंद्र पाटील घुले व चंद्रशेखर घुले पाटील या दोन्ही बंधूवर विश्वास दाखवत कारखाना निवडणूक बिनविरोध केली आहे.

कारखान्याच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु होती. उमेदवारी अर्ज माघारीनंतर 21 जागांसाठी फक्त 21 अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी जाहीर केले.

यावेळी घुले बंधूंनी काही नवीन चेहर्‍यांना संधी दिली असून माजी आ. पांडुरंग अभंग यांच्या ऐवजी त्यांच्या नातवाला संधी दिली आहे. तर देसाई देशमुख यांच्या ऐवजी त्यांच्या मुलाला संधी दिली आहे. काही विद्यमान संचालकांचा पत्ता कट करत नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे.

बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढील प्रमाणे - सर्वाधारण उत्पादक व्यक्ती सभासदांनी निवडून द्यावयाचे प्रतिनिधी मतदारसंघातून शेवगाव गटातून सुधाकर नारायणराव नरवडे, पंडीत रामभाऊ भोसले, रामनाथ नामदेव राजापुरे, शहरटाकळी गटातून नरेंद्र मारुतराव घुले, चंद्रशेखर मारुतराव घुले, बाळासाहेब बापुसाहेब खरड, कुकाणा गटातून नारायण कारभारी म्हस्के, हिंमतसिंह देसाई देशमुख, अमोल विठ्ठल पांडुरंग, नेवासा गटातून जनार्दन कचरु शेळके, दादासाहेब गुलाबराव कोकणे, वडाळा गटातून जनार्दन रामभाऊ कदम, प्रसाद जनार्दन पटारे, ढोरजळगाव गटातून मच्छिंद्र सूर्यभान म्हस्के, गोरक्षनाथ विठ्ठल भेंडेकर यांचा समावेश आहे.

तर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था व बिगर उत्पादक संस्था मतदार संघातून बबनराव मुरलीधर भुसारी, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून विकास चंद्रभान नन्नवरे, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून सुमनबाई दत्तात्रय काळे, रंजना अशोक तानवडे, इतर मागास वर्गीय मतदारसंघातून संतोष शंकरराव पावसे, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून अशोक लक्ष्मण मिसाळ असे एकुण 21 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

कारखाना सभासदांनी पुन्हा एकदा घुले बंधूंवर विश्वास दाखवत निवडणूक बिनविरोध केली आहे. यामुळे कारखाना काटकसरीने चालवून सभासदांच्या उसाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न यापुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply