Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात

‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय

दोन जागेसाठी झाले होते मतदान । आ. राजळेंचे निर्विवाद वर्चस्व कायम

पाथर्डी । वीरभूमी - Jun 27, 2026 • 01:17 PM 1523 views
तालुक्याची कामधेनू म्हणुन ओळख असलेल्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक संचालक मंडळाच्या कासार पिंपळगाव गटाच्या दोन जागेसाठी झालेल्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाने विजय मिळवला आहे. या अगोदर 17 जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामुळे आ. राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने सर्वच्या सर्व 19 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे.

ऊस उत्पादक मतदारसंघातील कासार पिंपळगाव गटाच्या दोन जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज राहिल्याने येथे शुक्रवारी मतदान झाले होते. 8708 सभासद मतदारांपैकी 5680 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. कासार पिंपळगाव गटातून सत्ताधारी आदिनाथ शेतकरी मंडळाकडून आप्पासाहेब राजळे व उद्धव वाघ हे तर विरोधी गटाकडून शिवशंकर राजळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन जागेसाठी शुक्रवारी मतदान होवून आज शनिवारी सकाळी पाथर्डी तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली.

यामध्ये आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार आप्पासाहेब राजळे यांना 4932 व उद्धव वाघ यांना 4158 ईतके मते पडून विजयी झाले. तर विरोधी शिवशंकर राजळे यांना 1642 मतांवर समाधान मानावे लागले. बॅलेटपेपर वर मतदान झाल्याने एकुण 67 मते बाद ठरली. मतमोजणीचा निकाल लागल्यानंतर राजळे समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.

यापुर्वीच सत्ताधारी आ. मोनिका राजळे गटाने 17 जागा बिनविरोध मिळवल्या होत्या. आता उर्वरीत दोन जागांही भरघोस मतांनी जिंकल्याने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी काम पाहिले तर त्यांना तहसीलदार उद्धव नाईक यांनी सहाय्य केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply