Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड

महेश जंजिरे यांनी दिल्लीच्या गुरुग्राममध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांसमोर केले शानदार संचलन..।

अहिल्यानगर । वीरभूमी- Apr 23, 2026 • 12:47 AM 184 views
नवी दिल्ली येथील गुरुग्राम मधील केंद्रीय राखीव पोलीस दल अकादमीत ‘सीआरपीएफ’ मधील असिस्टंट कमांडंट या पदाचे एक वर्षाचे अत्यंत खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 46 अधिकार्‍यांना आज (दि. 22) रोजी दीक्षांत समारंभात देशसेवेची शपथ देण्यात आली. यावेळी झालेल्या पासिॅग आऊट परेडमध्ये श्रीगोंदा येथील महेश जंजिरे यांनी शानदार संचालन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांच्यासह ‘सीआरपीएफ’चे विशेष महानिरीक्षक जकी अहमद, अकादमीचे संचालक अमित कुमार यांच्यासह ‘सीआरपीएफ’ चे अधिकारी, महेश शिंदे यांच्यासह प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 46 असिस्टंट कमांडंट अधिकार्‍यांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते.

अहिल्यानगर येथील महेश जंजिरे यांनी एक वर्षाच्या कठोर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणानंतर असिस्टंट कमांडंट म्हणून उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. महेश जंजिरे यांच्या या यशामुळे अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाने यूपीएससी परीक्षांची तयारी करणार्‍या तरुणांना प्रेरणा मिळत आहे.

या दीक्षांत समारंभासाठी महेश जंजिरे यांचे वडील ईश्वर जंजिरे, आई सुनीता जंजिरे, पत्नी वास्तुविशारद काजल दरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील दरेकर, अश्विनी दरेकर, अ‍ॅड. सविता बोठेपाटील यांच्यासह अहिल्यानगर व श्रीगोंदा येथील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

महेश जंजिरे यांनी यावेळी सांगितले की, युपीएससीमध्ये मराठी टक्का वाढायला हवा. मराठी मुलांमध्ये युपीएससी परीक्षेबाबतची विनाकारण असलेली भीती व न्यूनगंड दूर करुन त्यांच्यात अभ्यासाची जिद्द व प्रशासनात अधिकारी होण्याची उर्मी निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी तसेच शिस्तबद्ध अभ्यासासाठी महाराष्ट्रातील इच्छुक तरुणांना मदत करण्याची आपली तयारी आहे, असे महेश जंजिरे यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे दीक्षांत समारंभाला उपस्थित मराठी मंडळींनी जोरदार स्वागत करुन त्यांचे अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply