Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी

प्रखर उष्णतेमुळे हृदयविकाराचा झटका । प्राथमिक शिक्षिका उषा फापाळे यांचे निधन

पारनेर । वीरभूमी- Apr 23, 2026 • 11:13 AM 424 views
पारनेर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाचा फटका नागरिकांना बसत असून उष्माघातामुळे आणखी एक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गारगुंडी येथील रहिवासी आणि पिंपळगाव रोठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका उषा पोपट फापाळे (वय 50) यांचे उष्माघातामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान निधन झाले.

टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. ऋत्विज म्हस्के खिलारी यांनी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, फापाळे या नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी गारगुंडी येथून दुचाकीवरून पिंपळगाव रोठा येथे शाळेत गेल्या होत्या. सध्या शाळा सकाळच्या सत्रात भरत असल्याने दुपारी सुमारे 12 वाजता शाळा सुटल्यानंतर त्या प्रखर उन्हातच परतीच्या प्रवासाला निघाल्या.

घरी पोहोचल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अंगात अशक्तपणा, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागल्याने त्यांना तातडीने कान्हूर पठार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यापूर्वी ढवळपुरी येथील माळवडी भागात 45 वर्षीय महिलेचा शेतात काम करताना उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे तालुक्यात उष्णतेमुळे मृत्यूंची संख्या वाढत असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, मृतदेहाची उत्तरीय तपासणी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे.

तालुक्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे यांनी सांगितले की, दुपारी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक असल्यास डोक्यावर टोपी किंवा कपडा वापरावा. हलकी सुती वस्त्रे परिधान करावीत, भरपूर पाणी पिण्यावर भर द्यावा.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply